
पत्रकारांच्या नेहमीच पाठीशी
L36714
सावंतवाडी ः येथे तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत विकास सावंत, सोबत अच्युत सावंत भोसले, गजानन नाईक, गणेश जेठे आदी.
पत्रकारांच्या नेहमीच पाठीशी
विकास सावंत ः सावंतवाडीत पत्रकार पाल्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ ः माझ्या बोलीभाषेवर पत्रकारांमुळेच संस्कार झाले. राजकारणाच्या सुरुवातीला मी केवळ बोलायचो. मात्र, पत्रकार त्यावर उत्कृष्ट संस्कार करून ते विचार आपल्या वृत्तपत्रातून मांडायचे. यावेळी वाचताना आपण बोललेले शब्द आणि त्यावर त्यांनी केलेले संस्कार त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे अशा पत्रकारांच्या पाठीशी मी कायम राहणार आहे, असा शब्द भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते विकास सावंत यांनी आज येथे दिला.तालुका पत्रकार संघ, भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान, सावंतवाडी व यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा गौरव सोहळ्याचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात झाला. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
श्री. सावंत म्हणाले, "माझ्या राजकीय प्रवासात पत्रकारांचा मोठा वाटा आहे. दरम्यान पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा होणारा सन्मान त्यांना पुढील प्रवासात नक्कीच गती देईल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले ध्येय ठेवून त्याकडे वाटचाल करावी." यावेळी ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, भोसले नॉलेज सिटीचे अच्युत भोसले, राज्य पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक, पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष गणेश जेठे, खजिनदार संतोष सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष प्रवीण मांजरेकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर, शब्बीर मणियार, हरिश्चंद्र पवार, राजेश मोंडकर, विजय देसाई, मोहन जाधव, अमोल टेंबकर, दीपक गावकर, मयूर चराटकर, अनिल कामटेकर, अनिल मेस्त्री, मंगल कामत, उमेश सावंत, बाळ खडपकर, राजन नाईक, नंदकिशोर महाजन, अनिल कामटेकर, देवयानी वरसकर आदी मोठ्या संख्येने तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
यावेळी ओम टेंबकर, वेदांत गावकर, गिरीजा चव्हाण, अस्मि मांजरेकर, मैथिली कुडाळकर, काव्या सावंत, मनस्वी मांजरेकर, योगिता परब, तानिया भिसे, साई माधव, खुशी पवार, श्रावणी देसाई, वैष्णव सावंत, याचना सावंत, डॉ. यश पवार, तन्वी राऊत, बाळकृष्ण पोईपर, मनीष जाधव, चैताली जाधव, सुधाकर रेडकर, शर्वांणी धारणकर, गंधार पंडित, विपुल नाईक, रोशन नाईक, प्रिया नाईक आदी पत्रकारांच्या मुलांनी विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी केल्याबद्दल त्यांचा प्रशस्तीपत्र भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश पाटील आणि जुईली पांगम यांनी तर आभार प्रदर्शन हरिश्चंद्र पवार यांनी केले.
------------
चौकट
पत्रकारांना दहा
लाखाचे विमा कवच
विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी केल्याबद्दल पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा आज विशेष गौरव करण्यात आला. याप्रसंगी तालुक्यातील पत्रकारांना दहा लाखाचे विमा कवच देण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार संघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष प्रवीण मांजरेकर यांनी दिली. हे विमा कवच एका दात्याने पत्रकारांना दिले आहे. मात्र, आपले नाव प्रसिद्ध न करण्याची अट घातली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
-------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78223 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..