राजापूर-एसटीसमोरील अडचणीमुळे ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना त्रास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-एसटीसमोरील अडचणीमुळे ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना त्रास
राजापूर-एसटीसमोरील अडचणीमुळे ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना त्रास

राजापूर-एसटीसमोरील अडचणीमुळे ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना त्रास

sakal_logo
By

-rat17p23.jpg
36715
-राजापूर ः आगारप्रमुख सागर गाडे यांना निवेदन देताना पडवेचे उपसरपंच संतोष तांबे. शेजारी सुबोध बाकाळकर आणि सहकारी अधिकारी, कर्मचारी.
---------
एसटी चित्र वापरा
....
एसटी कधी मिळायची, शाळा कशी गाठायची?

अडचणीमुळे ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना त्रास; ग्रामीण भागातील फेऱ्या बंद, खासगी गाड्यांमुळे भूर्दंड
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १७ : कधी कमी मिळणारे भारमान, तर कधी अपुरी असलेले टायर आदी विविध कारणांमुळे एसटीची चाके डेपोमध्येच रुतलेली आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये अद्यापही गाड्या धावत नाहीत. त्याचा फटका शाळकरी मुलांना बसत असून त्यांना खासगी वाहनांना अव्वाच्या सव्वा भाडे देऊन शाळा गाठावी लागत आहे. काही पालकांसह मुलांना आर्थिकदृष्ट्या तेही करणे परवडेनासे होत नसल्याने त्यांच्याकडून काहीवेळा नाईलाजास्तव शाळेला दांडी मारावी लागत आहे.
तालुक्यातील जैतापूर मार्गावर यापूर्वी सुरू असलेली सकाळची एसटीची फेरी सद्यस्थितीमध्ये बंद आहे. त्याचा फटका पडवे गावासह त्या मार्गावरील अन्य गावांमधील शाळकरी मुलांना बसत आहे. त्यामुळे शाळकरी मुलांना उपयुक्त ठरणारी या मार्गावरील एसटीची फेरी तत्काळ सुरू करावी, अशी मागणी पडवेचे उपसरपंच संतोष तांबे यांनी केली आहे. याचे निवेदन त्यांनी आगारप्रमुख सागर गाडे यांना दिले. त्यांच्या या निवेदनाची दखल घेऊन आपल्या मागणीनुसार तत्काळ गाडी सुरू करण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे पडवेसह त्या मार्गावरील गावांमधील मुलांचा शाळेमध्ये ये-जा करण्याचा प्रश्‍न आता मार्गी लागणार आहे.
विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्‍यांनी पुकारलेला संप अनेक महिन्यांनी संपुष्टात आला असून त्यानंतर विविध मार्गावर पूर्वीप्रमाणे एसटी धावू लागेल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात होती. मात्र, सद्यस्थितीमध्ये ती फोल ठरली आहे. एसटी फेरीला कमी मिळणारे भारमान, तर कधी गाडीसाठी आवश्यक असलेल्या टायरच्या अनुलब्धततेमुळे अनेक गाड्या अद्यापही एसटी डेपोमध्ये उभ्या असल्याचे चित्र आहे. त्यातून अनेक मार्गावर गाड्या धावत नाहीत. त्याचा फटका शाळकरी मुलांना बसू लागला आहे.
...
चौकट
...त्या वेळची फेरी बंद
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्था शाळा गाठण्यासाठी एसटीचा आधार घेतात. मात्र, त्या मार्गावरील त्या वेळची फेरी बंद असल्याने मुलांसमोर शाळा कशी गाठायची, असा प्रश्‍न उभा ठाकला आहे. त्यामुळे गावांमधील शाळकरी मुलांना शाळेमध्ये ये-जा करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्‍या गाड्यांचा फेऱ्‍या पूर्वीप्रमाणे सुरू करण्याची मागणी पालकांसह शाळकरी मुलांकडून केली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78225 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top