साखरपा-बोरीवलेत आठवडाभर विजेचा खेळखंडोबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखरपा-बोरीवलेत आठवडाभर विजेचा खेळखंडोबा
साखरपा-बोरीवलेत आठवडाभर विजेचा खेळखंडोबा

साखरपा-बोरीवलेत आठवडाभर विजेचा खेळखंडोबा

sakal_logo
By

rat17p28.jpg-
36730
साखरपा : वीज वाहिनीवर लगडलेल्या वेली.
---------------
बोरीवलेत आठवडाभर विजेचा खेळखंडोबा
साखरपा, ता १७ : दाभोळे नजीकच्या बोरिवले गावातील बाजारपेठ परिसरात गेले आठवडाभर अनियमित विद्युत पुरवठा होत आहे. त्यामुळे व्यापारी आणि ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
दाभोळे गावानजीक असलेल्या बोरिवले बाजारपेठ हा परिसर गेले आठवडाभर अनियमित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त आहे. ह्या परिसरात दिवसातून अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. या परिसरात पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून करण्यात येणारी साफसफाई नीट करण्यात आलेली नाही. परिणामी सध्या अनेक ठिकाणी झाडे आणि फांद्या वीज वाहिनीला स्पर्श करून फ्यूज उडण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. काही ठिकाणी चक्क बांबूचा आधार देऊन विद्युत तारा वेगळ्या करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी विजेच्या खांबावर वेलींनी आक्रमण केले आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78236 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top