
रत्नागिरी-कॅरम लव्हर्स विरुद्ध सत्यशोधक अंतिम फेरी
कॅरम लव्हर्स विरुद्ध सत्यशोधकमध्ये अंतिम लढत
राष्ट्रीय लीग कॅरम स्पर्धा; विश्वविजेत्या खेळाडूंचा समावेश
रत्नागिरी, ता. १७ ः राष्ट्रीयस्तरावरील रत्नागिरी कॅरम लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत कॅरम लव्हर्स विरुद्ध सत्यशोधक या तगड्या संघात अंतिम लढत होणार आहे. दोन्ही संघांमध्ये विश्वविजेत्या खेळाडूंचा समावेश आहे.
रत्नागिरीतील हॉटेल विवेक येथे भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंफिगो, ओएनजीसी व क्रिस्टल पुरस्कृत रत्नागिरी लीग स्पर्धेत पहिल्या क्वालिफायर सामन्यात कॅरम लव्हर्सने अनुक्रमे सत्यशोधक स्ट्रायकर्सवर २-१ अशी मात केली त्यांच्या के श्रीनिवासनने योगेश परदेशीवर ९-२५, २३-१८ व २५-१७ तर अभिषेक चव्हाण व राहुल सोळंकी जोडीने महम्मद घुफान व एल सूर्यप्रकाश जोडीवर १३-३, २४-११ अशी मात केली. सत्यशोधक स्ट्रायकर्सच्या अहमद अली सय्यदने कॅरम लवर्सच्या महम्मद आरिफवर २५-२३, १७-१८ व २१-१४ असा एकमेव विजय नोंदविला. एलिमीनेटर सामन्यात लायबा कॅरम मास्टरने ३-० अशी व्हिक्टोरिअन्सवर सहज मात केली. अनुक्रमे त्यांच्या विकास धारियाने विश्र् विजेत्या प्रशांत मोरेला २५-१८, ८-२५, २२-१५ असे तर जुगल किशोर दत्तने अनिल मुंढेवर २५-१२, २३-१४ अशी आणि संदीप देवरुखकर आणि निसार अहमद जोडीने रियाझ अकबर अली आणि गिरीश तांबे जोडीवर मात केली. क्वालिफायर १ सामन्यात दुसर्या क्रमांकावर राहिलेल्या सत्यशोधक स्ट्रायकर्सने एलिमीनेटर सामन्यात जिंकलेल्या लायबा कॅरम मास्टर्सवर २-१ असा विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली.
..
चौकट
देवरुखकर आणि शेख जोडीवर एकमेव विजय
सत्यशोधक स्ट्रायकर्सच्या संघाच्या विकास धारियाने माजी विश्र् विजेत्या योगेश परदेशीवर २५-१९, १८-२५, २५-२१ असा तर जुगल किशोर दत्तने अहमद अली सय्यदवर १५-१२, ८-२५ व २०-१७ असा विजय मिळविला आणि आपल्या संघाला अंतिम फेरीत नेले. दुहेरीतील सामन्यात सत्यशोधक स्ट्रायकर्सच्या महम्मद घुफान आणि एल सूर्यप्रकाश जोडीने लायबा कॅरम मास्टर्सच्या संदीप देवरुखकर आणि निसार शेख जोडीवर २५-३, २०-१९ असा एकमेव विजय नोंदविला. कॅरम लव्हर्स विरुद्ध सत्यशोधक अशी अंतिम लढत होईल.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78257 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..