
रत्नागिरी-महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक
महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक; एकाला अटक
फ्लॅटसह नोकरीचे आमिष; संशयिताला पाच दिवस पोलिस कोठडी
रत्नागिरी, ता. १७ ः फ्लॅट आणि काम देण्याचे आमिष दाखवून महिलेची ३ लाख ५० हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळून त्याला शनिवारी (ता. १६) न्यायालयात हजर केले. यावेळी त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश अशोक मुरकर (रा. मागलाड फणसोप, रत्नागिरी) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात साक्षी अमोल पाटील (३६, रा. विमानतळ, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार ३० ऑक्टोबर ते १० डिसेंबर २०२१ या कालावधीत अमोलने साक्षी पाटील यांचा विश्वास संपादन करून फ्लॅट आणि काम मिळवून देतो, असे सांगत त्यांच्याकडून ३ लाख ५० हजार रुपये उकळले. पैसे देऊनही फ्लॅट आणि काम यातील काहीच न मिळाल्याने साक्षी पाटील यांनी अमोलला याबाबत वारंवार विचारणा केल्यावर त्याने टाळाटाळ करत होता. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांनी संशयिताला अटक केली. यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78271 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..