
कासार्डेतील हल्लाप्रकरणी कोल्हापूरचे दोघे ताब्यात
कासार्डेतील हल्लाप्रकरणी
कोल्हापूरचे दोघे ताब्यात
कणकवली, ता. १७ ः कासार्डे-जांभुळवाडी येथे मॉर्निंग वॉकला जात असताना तिघा अनोळखी तरूणांनी धारधार हत्याराने हल्ला केल्याप्रकरणी कोल्हापुरातील दोघा संशयितांना कणकवली पोलिसांनी आज अटक केली. रोहीत भरत मोरे (वय २१ रा. करवीर, कोल्हापूर) आणि शुभम जयसिंग सातपुते (वय २३ रा. सूर्यवंशीनगर, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. आज येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
या प्रकरणातील अन्य एकाला ताब्यात घेण्यात येणार असून संशयितांनी गुन्हाची कबुली दिल्याची माहिती सहायक पोलिस निरिक्षक सागर खंडागळे यांनी दिली.
हा प्रकार ९ जुनच्या पहाटे पाचच्या सुमारास कासार्डे-जांभुळवाडी येथे घडला होता. या झटापटील जगदीश सदाशिव डंबे (वय ५४ रा. कासार्डे जांभूळवाडी) यांना किरकोळ दुखापत झाली होती. या प्रकरणी त्यांनी येथील पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः कोल्हापूर पोलिसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये तिघा संशयितांना कोल्हापुरात २१ जूनला अटक केली होती. यावेळी त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी कासार्डे येथे झालेल्या प्रकाराची कबुली दिली होती. दोघे संशयित दोन वर्षांमध्ये अशा प्रकारे गुन्हे करत होते. त्यांच्या नावावर आतापर्यंत आठ गुन्ह्यांची नोंद आहे. सिंधुदुर्गात त्यांनी हा पहिलाच गुन्हा केला होता. कोल्हापूर पोलिसांनी त्यांना अटक करून तेथील गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आज त्यांना कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले. अन्य एकास न्यायालयातून ताब्यात घेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78273 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..