उभ्या टेम्पोला कंटेनरची धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उभ्या टेम्पोला कंटेनरची धडक
उभ्या टेम्पोला कंटेनरची धडक

उभ्या टेम्पोला कंटेनरची धडक

sakal_logo
By

36770
एडगाव ः अपघातग्रस्त वाहने.

उभ्या टेम्पोला कंटेनरची धडक

एडगावातील घटना; दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १७ ः दोन दिवसांपासून रस्त्यात थांबलेल्या टेम्पोला कंटेनरने धडक दिली. या अपघातातून टेम्पोमध्ये झोपलेला चालक सुदैवाने बचावला. हा अपघात रविवारी सकाळी नऊच्या सुमारास एडगाव येथे घडला. यात दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.
एडगाव घाडीवाडीनजीक बिघाड झालेला टेम्पो रस्त्याच्या कडेला थांबविण्यात आला होता. दोन दिवसांपासून हा टेम्पो याच ठिकाणी आहे. रविवारी सकाळी कोल्हापूरहून वैभववाडीच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ताबा सुटून कंटेनर उभा असलेल्या टेम्पोला जाऊन धडकला. त्यावेळी टेम्पो चालक टेम्पोत झोपला होता. सुदैवाने या अपघातात तो बचावला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांच्या दर्शनी बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थ व वाहन चालकांनी गर्दी केली होती. आधीच बिघाड झालेल्या टेम्पोला कंटेनरने धडक दिल्याने टेम्पोचे दुहेरी नुकसान झाले. या अपघाताची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांत झाली नव्हती.
..................
कारवाई करा!
दरम्यान, अशा अपघातांच्या घटना वाढत आहे. निष्काळजीपणे वाहने चालवल्यामुळेच अपघातांच्या घटना घडत आहेत. पण निष्पापांचा बळी जात आहे. अशा घटनांना आळा बसण्याची गरज आहे. महामार्गावर बेशिस्त उभ्या वाहनांवर कारवाई करण्याची गरज आहे. वाहतूक पोलिसांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78296 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top