चौकेकर कुटुंबाचे सांत्वन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौकेकर कुटुंबाचे सांत्वन
चौकेकर कुटुंबाचे सांत्वन

चौकेकर कुटुंबाचे सांत्वन

sakal_logo
By

३६५९९
चौके ः चौकेकर कुटुंबीयांचे सांत्वन करताना आमदार वैभव नाईक.

चौकेकर कुटुंबाचे सांत्वन
मालवण ः पोईपचे माजी सरपंच सगुण उर्फ आणा पालव यांचे निधन झाल्याने तसेच अपघाती निधन झालेल्या चौके येथील विजय चौकेकर यांच्या निवासस्थानी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन पालव व चौकेकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, माजी सरपंच बाबली पालव, राजा पालव, संजय गावडे, बी. जी. गावडे आदी उपस्थित होते.
-----------
नीलेश मेस्त्री यांची नियुक्ती
कणकवली ः महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उत्तर सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी कोंडये येथील नीलेश मेस्त्री यांची नियुक्ती झाली. जिल्हा दौऱ्यावर आलेले मनविसे जिल्हाध्यक्ष अमित ठाकरे यांनी मेस्त्री यांना नियुक्तीपत्र दिले. मेस्त्री यांच्याकडे वैभववाडी, देवगड, मालवण, कणकवली तालुक्यांची जबाबदारी दिली आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी मांडलेले विचार ध्यानात ठेवून पुढील वाटचाल करायची आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी आव्हाने, समस्यांचा अभ्यास तसेच वेळप्रसंगी आंदोलने करण्यासाठी सदैव सज्ज रहायला हवे, असे मेस्त्री यांना देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78299 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top