अकरावीच्या प्रवेशाबाबत २० जुलैला पहिली यादी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकरावीच्या प्रवेशाबाबत २० जुलैला पहिली यादी
अकरावीच्या प्रवेशाबाबत २० जुलैला पहिली यादी

अकरावीच्या प्रवेशाबाबत २० जुलैला पहिली यादी

sakal_logo
By

अकरावीच्या प्रवेशाबाबत
२० जुलैला पहिली यादी
कणकवली, ता. १८ ः दहावीच्या निकालानंतर प्रतीक्षेत असलेल्या अकरावी वर्गातील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या कोल्हापूर विभागीय मंडळाच्यावतीने कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. प्राप्त अर्जातील पहिली गुणवत्ता यादी २० जुलैला दुपारी तीनला प्रसिद्ध होणार आहे.
जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी १२ ते १६ जुलै या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविणे आणि अर्ज कनिष्ठ महाविद्यालयस्तरावर स्वीकारणे, त्यानंतर १८ आणि १९ जुलैला आलेल्या प्रवेश अर्जाची छाननी तपासणी गुणवत्तेनुसार करून प्राप्त झालेल्या प्रवेश अर्जांची निवड यादी तयार केली जाणार आहे. पहिली निवड यादी त्या त्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या फलकावर २० जुलैला प्रसिद्ध केली जाणार आहे. अतिरिक्त ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रतीक्षा यादीवर ठेवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवड यादी आणि प्रतीक्षा यादी महाविद्यालयांच्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या फलकावर लावली जाणार आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांना २१ ते २५ जुलै या चार दिवसांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश शिल्लक असलेल्या आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्राच्या आधारावर २६ आणि २७ जुलैला प्रवेश दिला जाणार आहे. दुसरी प्रतीक्षा यादी २८ आणि २९ जुलैला जाहीर करून प्रवेश दिला जाणार आहे. शिक्षण विभागाच्या या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष अकरावीचे वर्ग सुरू होणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78351 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top