बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलला स्वच्छ विद्यालय पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलला स्वच्छ विद्यालय पुरस्कार
बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलला स्वच्छ विद्यालय पुरस्कार

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलला स्वच्छ विद्यालय पुरस्कार

sakal_logo
By

36815
बॅरिस्टर नाथ पै शैक्षणिक संकुल.

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलला
स्वच्छ विद्यालय पुरस्कार

कुडाळ, ता. १८ ः भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे दिला जाणाऱ्या जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्काराने येथील बॅ नाथ पै सेंट्रल स्कूल (सीबीएसई बोर्ड) ला नुकतेच सन्मानित करण्यात आले. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा मुख्यालयात आयोजित सोहळ्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण नुकतेच झाले. स्कूलच्या ॲकॅडमिक हेड चैताली बांदेकर, सहकारी शिक्षिका मधुरा इन्सुकर, अश्विनी परब, विभा वझे व पालक मनाली पाटकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
शासनाच्यावतीने केलेल्या सर्वेक्षणानुसार शाळेला स्वच्छता या विभागात ९५ टक्के गुणासह पाच स्टार रेटिंग प्राप्त झाले. कोविड पूर्वतयारी व उपायोजना व प्रसाधनगृहे, स्वच्छता या उपविभागातहे फाईव्ह स्टार रेटिंग प्राप्त झाले आहे. या स्कूल आता राज्यस्तरीय पुरस्काराच्या नामांकनसाठी पात्र झाले आहे. बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळच्या प्रिन्सिपल शुभांगी लोकरे-खोत, सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या निकष, गाईड लाईन नियमानुसार केलेल्या सातत्यपूर्ण कामाचा हा सन्मान असून स्कूलच्या संपूर्ण टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78361 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top