कणकवलीत आज शेतीचे धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत आज शेतीचे धडे
कणकवलीत आज शेतीचे धडे

कणकवलीत आज शेतीचे धडे

sakal_logo
By

कणकवलीत आज शेतीचे धडे
कणकवली ः श्री पावणादेवी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीतर्फे तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीविषयी आणि शेतीपूरक व्यवसाय विषयी मोफत मार्गदर्शनाचे आयोजन केले आहे. शहरातील भगवती मंगल कार्यालय येथे उद्या (ता.१९) हा मार्गदर्शनाचा कार्यक्रम सकाळी साडेदहाला होणार आहे. शेती आणि बदललेले शेतीचे अर्थकारण लक्षात घेऊन हरितक्रांती नंतर आता बळीराजा इंधनक्रांतीकडे वाटचाल करू लागला आहे. हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कंपनीच्या वतीने ग्रामीण भागामध्ये ग्राम उद्योजक तयार केले जात आहेत. याबाबतचा प्रचार आणि प्रसार कंपनीच्यावतीने सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांना अद्यावत शेतीचे ज्ञान मिळण्यासाठी या व्यवसायातील मार्गदर्शक संजय कामरे, सुधीर फडके तसेच हर्षल हल्लारवाडकर हे मार्गदर्शन करणार आहेत. ‘शेती आणि शेतीपूरक व्यवसाय, शेतीतून इंधनाचे उत्पादन’, असा या कार्यक्रमाचा हेतू आहे. यात सहभाग घेण्याचे आवाहन कंपनीचे संचालक डी.डी. रासम यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78373 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..