
रत्नागिरी- ''मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे'' आता ''स्टोरीटेल''वर
-rat१८p८.jpg
L३६८५६
- रत्नागिरी ः स्टोरीटेलवरील मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे कादंबरीचे मुखपृष्ठ.
-------------
''मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे'' आता ''स्टोरीटेल''वर
माधव कोंडविलकरांचे आत्मचरित्र; मंगेश सातपुतेंचा आवाज
रत्नागिरी, ता. १८ ः राजापूरचे प्रसिद्ध लेखक (कै.) माधव कोंडविलकर यांचे आत्मचरित्र ''मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे'' आता ''स्टोरीटेल''वर ऑडिओ बुक स्वरूपात उपलब्ध झाले आहे. ''स्टोरीटेल''ने हे ऑडिओ बुक १५ जुलैला कोंडविलकर यांच्या जन्मदिनी प्रकाशित केले आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक मंगेश सातपुते यांनी आपल्या उत्तम आवाजात अतिशय प्रभावीपणे या पुस्तकाचे वाचन केले आहे. या पुस्तकाला १९८४ ला महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला. या पुस्तकावर संशोधनपर प्रबंध (पीएचडी) झाले आहेत आणि अजूनही होत आहेत. शालेय आणि विद्यापीठीय अभ्यासक्रमांमध्ये हे पुस्तक अभ्यासाला आहे. हे पुस्तक भारतभरच नव्हे, तर सातासमुद्रापलीकडे गेले आहे. या पुस्तकाचे हिंदी आणि फ्रेंच भाषेत अनुवाद झाले आहेत. कोंडविलकर यांची कन्या डॉ. ग्लोरिया अमोल खामकर यांनी आवाहन केले आहे की, वाचकांनी हे ऑडिओ बुक ऐकावे आणि अभिप्राय ''माधव कोंडविलकर'' फेसबुक पेजवर कळवावेत.
कोंडवलिकर यांचा जन्म १९४१ मध्ये झाला आणि २०२० मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी कविता, कथा, कादंबरी, आत्मकथन या प्रकारातून त्यांनी दलित, पीडित व उपेक्षित समूहाच्या व्यथा, वेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी अजून उजाडायचं आहे, आता उजाडेल, एक होती कातळवाडी, घालीन लोटांगण, डाळं, देवांचा प्रिय प्रियदर्शनी राजा सम्राट अशोक, स्वामी स्वरूपानंद, हाताची घडी तोंडावर बोट ही पुस्तके लिहिली.
------------
कोट
स्टोरीटेलवर कोंडविलकर यांच्या मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे या आत्मकथनातून समाजातील अन्यायी जाती व्यवस्थेला थेट प्रश्न विचारण्याचे धाडस केले आहे. कोकणातील ग्रामीण राजापुरी शैलीतील संवाद ऐकताना ही वास्तववादी कादंबरी श्रोत्यांच्या थेट काळजाला भिडते. लवकरच कोंडविलकर यांच्या आणखी दोन कादंबऱ्या ऑडिओबुक्स स्वरूपात प्रकाशित करणार आहोत.
- प्रसाद मिरासदार, पब्लिशिंग मॅनेजर
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78419 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..