रस्ते सिमेंट-काँक्रिटचे करावेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ते सिमेंट-काँक्रिटचे करावेत
रस्ते सिमेंट-काँक्रिटचे करावेत

रस्ते सिमेंट-काँक्रिटचे करावेत

sakal_logo
By

रस्ते सिमेंट-काँक्रिटचे करावेत
धोंडू चिंदरकर ः राणेंच्या माध्यमातून पाठपुरावा करणार
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १८ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी जिल्ह्यातील पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याची मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी केली आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी खासदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील दरवर्षीच्या अतिवृष्टीचा विचारकरता या जिल्ह्यात जास्त रहदारी या निकषाखाली जे रस्ते येतात ते (मुख्यमंत्री ग्रामसडक आणि पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्ते) डांबरीकरणाऐवजी सिमेंट-काँक्रिटचे झाले, तर दरवर्षी रस्त्यांना पडणाऱ्या खड्ड्यांच्या साम्राज्याला आळा बसेल. काँक्रिटीकरणाचा खर्च जरी अधिक असला, तरी वरचेवर दुरुस्तीच्या नावाखाली पैशाचा होणारा अपव्यय टाळून बजेटमधील खर्चात ही कामे दर्जेदार होतील. मोठ्या रस्त्यांची डागडुजी ज्या संस्थेला दिली जाते, त्याऐवजी ती देखभाल दुरुस्ती ज्या स्वायत्त संस्थेच्या कार्यक्षेत्रातून जातो (ग्रामपंचायत आदी) त्याची डागडुजी त्या संस्थेकडे पैशाच्या तरतुदीसहित देण्यात यावी. असे झाले तर कोकणात वारंवार खड्ड्यांच्या समस्येपासून जनता आणि वाहनचालकांची सुटका होऊ शकते, असे मत चिंदरकर यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे पावसाळ्यात डांबरीकरण करता येणार नाही यासह इतर अनेक कारणे कालबाह्य होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. यासाठी माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांच्या पुढाकाराने व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून राज्य आणि केंद्रस्तरावर पाठपुरावा करणार असून, यासाठी सर्व पक्षीय, स्वायत्त संस्था, सामाजिक संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. चिंदरकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78447 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..