
संक्षिप्त
मालवणात २४ ला
बुद्धिबळ प्रशिक्षण
मालवण : येथील बॅ. नाथ पै सेवांगण आणि मुक्ताई अकॅडमी, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली ते महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी २४ जुलैला सकाळी ९ ते दुपारी १.३० या वेळेत मोफत बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन बॅ. नाथ पै सेवांगणच्या दादा शिखरे सभागृहात करण्यात आले आहे. या शिबिरात मुक्ताई अकॅडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. यावेळी अकॅडमीचे ७ ते १७ वयोगटातील राष्ट्रीय खेळाडू अनुभवकथन करणार आहेत. प्रथम नाव नोंदविणाऱ्या ३० विद्यार्थ्यांना या शिबिरामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. तरी या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा, इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन बॅ. नाथ पै सेवांगणच्या वतीने केले आहे.
----------
‘भारताचे राष्ट्रपती’वर
प्रश्नमंजूषा स्पर्धा
मालवण : येथील बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे बॅ. नाथ पै जन्मशताब्दीनिमित्त २४ जुलै रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत ‘भारताचे राष्ट्रपती’ या विषयावर प्रश्नमंजूषा स्पर्धा होणार आहे.
बॅ. नाथ स्पर्धेत भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक व भारताचे राष्ट्रपती यावर आधारित ३० प्रश्न विचारले जाणार आहेत. ‘सेवांगण’ उपक्रम समूह १, २ व ३ या ‘फेसबूक पेज’वर प्रश्न पाठविले जातील. इच्छुकांनी २१ जुलैपर्यंत प्रश्नांची उत्तरे दीपक भोगटे यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावीत, असे आवाहन केले आहे.
----------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78449 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..