हापूस व्यवस्थापनात खत तुटवड्याची अडचणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हापूस व्यवस्थापनात खत तुटवड्याची अडचणी
हापूस व्यवस्थापनात खत तुटवड्याची अडचणी

हापूस व्यवस्थापनात खत तुटवड्याची अडचणी

sakal_logo
By

हापूस व्यवस्थापनात
खत तुटवड्याची अडचण

पुढील हंगामाची तयारी; पसंतीची खते मिळत नसल्याचे चित्र

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १८ ः तालुक्यातील आंबा बागायतदारांचे पुढील वर्षीच्या आंबा हंगामाच्या दृष्टीने नियोजन सुरू झाले आहे. झाडांना खत, संजीवके देण्याबरोबरच पावसाळी मशागतीची लगबग अंतिम टप्यात आहे. पाऊसही समाधानकारक पडत असल्याने खत व्यवस्थापन सुरू आहे; मात्र खताच्या तुटवड्यामुळे बागायतदारांच्या पसंतीची खते मिळाली नसल्याचेही चित्र आहे.
गतवर्षी हंगाम चांगला झाला. पहिल्या टप्यात आलेल्या मोहोरातून अपेक्षित फलधारणा झाली नसली तरीही अखेरच्या टप्यात भरपूर आंबा उत्पादन झाले. गतवर्षी आंबा उत्पादन कमी होणार असल्याचे बागायतदाराचे हंगामाच्या सुरूवातीला निरीक्षण होते. तरीही अखेरच्या टप्यात अपेक्षेपेक्षा अधिकच उत्पादन झाल्याचे चित्र होते. सरसकट सर्वांकडेच आंबा नसला तरी काहींकडे अखेरच्या टप्यात मुबलक पीक होते. अखेरच्या टप्यात एकाचवेळी आंबा तयार झाल्याने दराची काहीशी घसरण झाली. अवकाळी पावसाने दिलासा दिल्याने झाडावरील बहुतांशी सर्व आंबा बागायतदारांच्या हाती येऊ शकला. खरेदी विक्री केंद्रावर मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीस होता. ज्यांच्याकडे चांगल्या प्रतिचा आंबा होता त्यांना चांगला दर मिळाला. वातावरणातील बदल, मोहोरामधील नरफुलांचे वाढते प्रमाण यामुळे पहिल्या टप्यातील उत्पादनात घट झाली असली तरी अखेरच्या टप्यात मुबलक आंबा बाजारात आला. मात्र, गतवर्षी फळमाशी बागायतदारांच्या दृष्टीने मोठी डोखेदुखी ठरली. तयार चांगल्या आंबा फळावर फळमाशीचा प्रादुर्भाव झाला आणि बागायतदारांच्या नुकसानीची तीव्रता वाढली. झाडावरील हिरव्या आंब्याला फळमाशीचा प्रादुर्भाव अधिक जाणवला; मात्र असे असले तरीही मागील आंबा हंगामाची चिंता कुरवाळीत बसण्यापेक्षा बागायतदारांचे लक्ष आता पुढील वर्षीच्या आंबा हंगामाकडे लागले आहे. त्यादृष्टीने मोठ्या प्रयोगशील बागायतदारांचे आतापासूनच नियोजन सुरू झाले आहे.
यंदा पावसाळा काहीसा उशिरा सुरू झाला. सध्या पाऊस समाधानकारक पडत आहे. त्यामुळे झाडांना खते, संजीवके देण्याची लगबग अखेरच्या टप्यात आहे. ग्रामीण भागात आंबा कलमांची मशागत करण्यासाठी असलेले कामगार आपापल्या शेतीमध्ये व्यस्त होण्याआधीच खत व्यवस्थापन पूर्ण झाल्याचेही काही भागातील चित्र होते. यंदा खताचा तुटवडा जाणवला. दर्जेदार कंपनीची खते मागणी असूनही पुरवठा झालेली नाहीत. व्यावसायिक लाभाच्या अनुषंगाने जास्त नफा असलेली खते बाजारात उपलब्ध झाल्याने शेतकर्‍यांची अडचण झाली; मात्र तरीही शेतकर्‍यांनी पर्यायी व्यवस्था करून मशागत पूर्ण केली. बाजारात विविध कंपन्यांची संजीवकेही उपलब्ध झाल्याने बागायतदारांना व्यावसायिक स्पर्धेचा फायदा झाला. त्यामुळे दरात काहीशी कमीजास्तपणा झाला. व्यावसायिक स्पर्धेचाही बागायतदारांना लाभ झाला.
..............
चौकट
असा काढला मार्ग
गेल्या हंगामात फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे दलालांव्यतिरिक्त आंबा विक्री करणार्‍या बागायतदारांनी नुकसान टाळून ग्राहकांसोबतची विश्‍वासार्हता अबाधित राखण्यासाठी पिकवून आंबा विक्री करण्यावर भर दिला. आंबा पिकल्यावर फळमाशीचा प्रार्दुभाव असल्यास निदर्शनास येत होता. त्यामुळे फळमाशीवर बागायतदारांनी असाही तोडगा काढल्याचे चित्र होते.
...........
कोट
३६८९३
आंबा कलमांना खत घालून झाले आहे. यंदा खतांचा तुटवडा जाणवला. अपेक्षेप्रमाणे दर्जेदार कंपन्याची खते बागायतदारांना मागणीप्रमाणे उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करून मशागतींची कामे उरकण्यात आली आहेत. नामांकित खतासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचा खटाटोप असल्याने त्याचाही परिणाम जाणवतो. व्यावसायिक स्पर्धेमुळे अनेक प्रकारची संजीवके बाजारात असल्याने दरातील तफावत कळाली.
- रूपेश पारकर, आंबा बागायतदार, वरेरी, देवगड

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78452 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..