
कणकवली : कलमठ उपोषण
L३६९१९
कणकवली : येथील तहसील कार्यालयासमोर कलमठ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी उपोषण छेडले आहे.
---------------
कलमठ सरपंच, पदाधिकाऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण
कलमठ-लांजेवाडी येथील रस्त्यावर अतिक्रमण : रस्ता खुला होईपर्यंत उपोषणाचा निर्धार
कणकवली, ता.१८ : कलमठ-लांजेवाडी येथील सहा मिटरचा रस्ता बंद करण्यात आला आहे. या रस्त्यावर अनधिकृत बांधकाम झाल्याने नागरिकांची ये-जा करण्याची अडचण होत आहे. याबाबत तक्रार करूनही तहसीलदारांकडून कार्यवाही होत नसल्याने कलमठ सरपंचासह इतर पदाधिकाऱ्यांनी आज तहसील कार्यालयासमाेर उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणामध्ये कलमठ सरपंच धनश्री मेस्त्री यांच्यासह पंचायत समितीचे माजी सदस्य महेश लाड, उपसरपंच वैदेही गुडेकर, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील चिंदरकर, विजय चिंदरकर, संदीप मेस्त्री, राजू नारकर, रुपेश सावंत, संदेश सावंत, विलास गुडेकर, चंद्रशेखर हजारे, बाबू नारकर, विलास गुडेकर आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित आहेत.
सरपंच धनश्री मेस्त्री यांनी म्हटले की, कणकवली उपविभागीय अधिकारी यांनी कलमठ-लांजेवाडी या भागात बिनशेती प्लॉट मंजूर करताना सहा मिटरचा रस्ता सोडण्याचे आदेश केले होते. मात्र सध्या हा सहा मिटरचा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्या ठिकाणी इमारत बांधकाम केले जात आहे. या अतिक्रमाविरोधात तहसीलदार व तत्सम अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र कोणतीही कार्यवाही झाली नाही. हा रस्ता कलमठ लांजेवाडी येथील नागरिकांना जाण्यासाठी बंद आहे.
दरम्यान कणकवली प्रांताधिकारी किंवा कणकवली तहसीलदार आणि तातडीने या उपोषणावर मार्ग काढण्यासाठी त्वरित कारवाई करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. जोपर्यंत रस्ता खुला होत नाही तोपर्यंत लढा देण्याचा निर्धार कलमठ ग्रामस्थांनी केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78484 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..