संक्षिप्त-2 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त-2
संक्षिप्त-2

संक्षिप्त-2

sakal_logo
By

मालवण सेवांगणतर्फे
प्रश्नमंजुषा स्पर्धा
मालवण ः येथील बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे बॅ. नाथ पै जन्मशताब्दीनिमित्त २४ ला दुपारी ३ ते ६ या वेळेत ''भारताचे राष्ट्रपती'' या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक व भारताचे राष्ट्रपती यावर आधारित ३० प्रश्न विचारले जाणार आहेत. सेवांगण उपक्रम समूह १, २ व ३ या फेसबूक पेजवर प्रश्न पाठविले जातील. इच्छुकांनी २१ जुलैपर्यंत प्रश्नांची उत्तरे दीपक भोगटे यांच्या व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
-------------
शेतकऱ्यांना आवाहन
कणकवली, ता. १८ ः संभाव्य नुकसानीच्या भरपाईसाठी शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन येथील तालुका कृषी अधिकारी श्रीमती मुळे यांनी केले आहे. अंतिम मुदत ३१ जुलै असल्याची माहिती त्यांनी दिली.
----------------
होडावडेत आज
शेती कार्यशाळा
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने दूध उत्पादक शेतकर्‍यांची कार्यशाळा १९ ला सकाळी १०.३० वाजता मराठे सभागृह होडावडा येथे आयोजित केली आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, पशू दुग्ध मत्स्य संस्था प्रतिनिधी तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, गोकुळ दूध संघ सहायक व्यवस्थापक पशुसंर्वधन विभाग डॉ. प्रकाश साळुंके, पशुवैद्यकीय अधिकारी गोकुळ दूध संघ कोकण विभाग डॉ. नितीन रेडकर व कोलगाव येथील यशस्वी दूध उद्योजक ज्ञानेश्वर सावंत उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने वेंगुर्ले विकास अधिकारी डी. आर. प्रभुआजगावकर यांनी केले आहे.
------------
मालवणात २४ ला
बुद्धिबळ प्रशिक्षण
मालवण ः येथील बॅ. नाथ पै सेवांगण आणि मुक्ताई अॅकॅडमी, सावंतवाडीतर्फे पहिली ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोफत बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन २४ ला सकाळी ९ ते दुपारी १.३० या वेळेत बॅ. नाथ पै सेवांगणच्या दादा शिखरे सभागृहात करण्यात आले आहे. कौस्तुभ पेडणेकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78514 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..