मानधनवाढीसह विविध मागण्यांबाबत ''आशा वर्कर्स''चे प्रशासनास निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानधनवाढीसह विविध मागण्यांबाबत
''आशा वर्कर्स''चे प्रशासनास निवेदन
मानधनवाढीसह विविध मागण्यांबाबत ''आशा वर्कर्स''चे प्रशासनास निवेदन

मानधनवाढीसह विविध मागण्यांबाबत ''आशा वर्कर्स''चे प्रशासनास निवेदन

sakal_logo
By

L36939

सिंधुदुर्गनगरी ः निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांना निवेदन देताना ''आशा वर्कर्स''चे पदाधिकारी.

मानधनवाढीसह विविध मागण्यांबाबत
''आशा वर्कर्स''चे प्रशासनास निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १८ ः आशा व गटप्रवर्तक आरोग्य क्षेत्रामध्ये मोठ्या हिरिरीने जनता व आरोग्य व्यवस्था यांच्यामधला दुवा म्हणून काम करत असताना गेल्या काही वर्षांत केंद्राने आशा व गटप्रवर्तकांना काहीच मानधनवाढ दिली नाही. त्यामुळे आशा मागणी दिवसानिमित्त शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या वतीने निवेदन देण्यात आले.

आशा व गटप्रवर्तकांना जोखिम भत्ता (कोविड-१९ साठी) प्रतिमहिना १००० रुपये पुन्हा चालू करा. पूर्वलक्षी प्रभावाने हा भत्ता प्रति महिना १० हजार एवढा करावा. ५० लाख रुपये विमा कवच लागू करावे. ज्यांचे थकीत राहिले आहे, ते त्वरित देण्यात यावे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम करा. ४५ व्या व ४६ व्या श्रमपरिषदेच्या शिफारशी आशा व गटप्रवर्तक यांना लागू करा. सेवेत कायम करा. दरमहा किमान वेतन २६ हजार रुपये द्या. मानधन प्रत्येक महिन्याच्या चार तारखेपर्यंत मिळावे. सार्वजनिक आरोग्यासाठी कायदा करा व एकूण बजेटच्या ६ टक्के रक्कम आरोग्यासाठी द्यावी. हॉस्पिटलसह आरोग्य सेवांचे कोणत्याही प्रकारे खासगीकरण करण्यात येऊ नये. राष्ट्रीय डिजिटल स्वास्थ्य मिशन बंद करावे. सार्वजनिक सेवांचे खासगीकरण करू नये. आशा व गटप्रवर्तकांना कामगार कायद्याअंतर्गत कामगार म्हणुन समाविष्ट करा, अशा मागण्यांचे निवेदन आज निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्याकडे सादर केले. यावेळी शिष्टमंडळामध्ये युनियनच्या जिल्हा अध्यक्ष प्रियांका तावडे, जिल्हा कमिटी सदस्य अंकिता कदम, आरोही पावसकर इत्यादी सहभागी झाले होते. तसेच आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्यांचे निवेदन वैभववाडी, देवगड, कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यांतील युनियनच्या तालुका कमिटीच्या वतीने तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना देण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78515 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top