रत्नागिरी-देवरूख सह्याद्रीनगरमधील जुगारावर छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-देवरूख सह्याद्रीनगरमधील जुगारावर छापा
रत्नागिरी-देवरूख सह्याद्रीनगरमधील जुगारावर छापा

रत्नागिरी-देवरूख सह्याद्रीनगरमधील जुगारावर छापा

sakal_logo
By

जुगारावर छापा; दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

देवरूख- सह्याद्रीनगरमध्ये कारवाई; आठजणांना अटक
रत्नागिरी, ता. १८ ः संगमेश्वर पोलिसांनी जुगारविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. सह्याद्रीनगर येथे पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा टाकून १ लाख ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत ८ संशयितांना अटक केली आहे.
संगमेश्वर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी देवरूख शहरातील कदम चाळ येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पूर्ण तयारीनिशी येथे छापा टाकला. संशयित विजय गणपत कदम यांच्या मालकीच्या खोलीमध्ये हा जुगार अड्डा सुरू होता. यामध्ये जुगार खेळणारे विजय गणपत कदम (घरमालक), संदीप अनंत देसाई, गंगेश शिवराग पर्शराग, अब्दुल सत्तार दाऊद लांबे, महेंद्र मनोहर लिंगायत, आत्माराम शंकर देवळेकर, भिकशेठ हरिश्चंद्र पाथरे, सुधीर बाबसा कांबळे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये कारवाई केली. कारवाईमध्ये रोख रक्कम व इतर साहित्यासह १ लाख ९५ हजार ३८० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. देवरूख पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या देशमुख यांच्या पथकाने केली आहे.
-------------
चौकट-
शेजारचे पोलिस टाकणार छापा
पोलिस अधीक्षकांच्या सूचनेवरून शेजारच्या पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याकडून अशाप्रकारे अवैद्य धंद्यांवर धाडी टाकण्याच्या पद्धतीने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिस अधीक्षक यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78532 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..