खेड ः शिवसेना नेते रामदास कदम यांच्या राजीनाम्याने खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः शिवसेना नेते रामदास कदम यांच्या राजीनाम्याने खळबळ
खेड ः शिवसेना नेते रामदास कदम यांच्या राजीनाम्याने खळबळ

खेड ः शिवसेना नेते रामदास कदम यांच्या राजीनाम्याने खळबळ

sakal_logo
By

फोटो ओळी
rat18p28.jpg-
३६९६५ रामदास कदम

रामदास कदमांच्या राजीनाम्याने सेनेत अस्वस्थता

नेतेपद संघटनेला निरुपयोगी : कदम; चौकडीकडून वेदनादायी वागणूक

सिद्धेश परशेट्ये ःसकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १८ ः मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असून, अखेरपर्यंत शिवसैनिकच राहीन. त्यांनी दिलेले नेतेपद संघटनेच्या जर उपयोगी पडत नसेल तर त्या पदाचे मी काय करू? आगामी कालावधीत मी माझी सविस्तर भूमिका जाहीर करणार आहे. गेल्या तीन वर्षांत पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आजूबाजूला असलेल्या चौकडीकडून मला जी वागणूक मिळाली आहे ती खूपच वेदनादायी आहे, अशी खंत व्यक्त केली. ज्येष्ठ शिवसैनिकांमध्येही यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे.
शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे संघटनात्मक नेतेपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त धडकल्यानंतर कोकणातील शिवसैनिकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. या संदर्भात रामदास कदम यांच्याकडे संपर्क साधला असता आपण विचारांती निर्णय घेतला असून, आगामी कालावधीत सविस्तरपणे या संदर्भात भूमिका मांडणार असल्याचे सांगितले. आमदार योगेश कदम यांनी राज्यातील आघाडी सरकार उलथवून टाकण्यासाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आहे. शिवसेना नेते रामदास कदम कोणती भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. सोमवारी (ता. १८) कदम यांनी आपल्या संघटनात्मक नेतेपदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. यामध्ये त्यांनी आपल्या राजीनाम्याची कारणे नमूद केली असून, राज्यात गत विधानसभा निवडणुकीनंतर झालेले शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या आघाडीच्या विरोधात आपण होतो, हे मी याआधीच मांडले आहे.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची नेतेपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर संभाजीनगर, कोल्हापूर आदी ठिकाणची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळत संघटनावाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. युती सरकाराच्या काळात गृहराज्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री व त्यानंतरच्या कालखंडात ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. गतविधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्याकडील पर्यावरण मंत्रालय आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आले. आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळातदेखील त्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. ज्येष्ठ अनुभवी असलेल्या कदम यांना पूर्णपणे बाजूला सारण्यात संघटनांतर्गत काही लोकांचा हात असल्याचा आरोप कदम यांच्या समर्थकांकडून होत होता. त्यातच कदम यांनी जाहीरपणे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर घणाणाती टीका केली होती. या वेळी त्यांनी पक्षप्रमुखांना थेट आवाहन करत शिवसेनेतील गद्दारांना रोखण्याची विनंती केली होती; परंतु त्यानंतर कदम शिवसेनेच्या कोणत्याही व्यासपीठावर दिसले नव्हते.

चौकट
शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी केले
ज्या संघटनेला वाढवण्यासाठी माझ्यासारख्या असंख्य शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी केले, संघटनेच्या आणि बाळासाहेबांच्या शब्दाखातर अनेकांना अंगावर घेतले. माझ्या वाट्याला आज पक्ष सोडण्याची वेळ यावी हे दुर्दैवी आहे, अशी खंत रामदास कदम यानी व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78564 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..