सराईत मोबाईल चोरट्याला गोव्यातील मडगावात अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सराईत मोबाईल चोरट्याला गोव्यातील मडगावात अटक
सराईत मोबाईल चोरट्याला गोव्यातील मडगावात अटक

सराईत मोबाईल चोरट्याला गोव्यातील मडगावात अटक

sakal_logo
By

सराईत मोबाईल चोरट्याला
गोव्यातील मडगावात अटक
कणकवली, ता.१८ : कणकवलीत चोरीस गेलेल्‍या मोबाईल प्रकरणी कणकवली पोलिसांनी आज बिक्रम महेंद्र ठाकुरी (वय २६ वर्षे, रा. मडगाव, गोवा, मूळ मैतीदेवी, काठमांडु नेपाळ) या संशयिताला ताब्‍यात घेतले. त्‍याने मोबाईल चोरीची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कणकवली शहरालगतच्या भिकाजी धोंडु अस्वेकर, (वय ७९ वर्षे, रा . आशिये) यांचा मोबाईल १ फेब्रुवारी २०२२ चोरीला गेला होता. या चोरीनंतर कणकवली पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे संशयिताचा शोध सुरू केला होता. आज पहाटे पावणेचारच्या सुमारास संशयित पोलिसांच्या हाती लागला. मडगाव रेल्‍वे स्थानकाच्यालगतच्या पदपथावरून त्याला ताब्‍यात घेतले. उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलिस नाईक पांडुरंग पांढरे, हवालदार चंद्रकांत झोरे यांच्या पथकाने कामगिरी बजावली. हा संशयित नेपाळी असून सराईत चोरटा असून मद्यपी आहे. दारूसाठी तो रोज मोबाईल चोरी करायचा. चोरीचा मोबाईल त्याने मडगावात एकाला विकला होता. मोबाईलचे लोकेशन पोलिसांना मिळाले होते. त्यामुळे पोलिस पथकाने दोन दिवसांपूर्वी मोबाईल जप्त केला होता. त्‍यानंतर संशयिताला पकडण्यासाठी सापळा रचला होता. अखेर आज पहाटे ठाकुरीला ताब्‍यात घेतले. त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस नाईक पांडुरंग पांढरे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78629 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top