आमदार दीपक केसरकरांना मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार दीपक केसरकरांना मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा
आमदार दीपक केसरकरांना मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

आमदार दीपक केसरकरांना मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

sakal_logo
By

37001
मुंबई ः आमदार केसरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

आमदार दीपक केसरकरांना
मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा
सावंतवाडी, ता. १८ ः राज्याचे माजी गृह राज्यमंत्री, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत शिंदे गटाचे प्रतोद भरतशेठ गोगावले, खासदार आनंदराव अडसूळ यांसह शिंदे शिवसेनेचे खासदार, आमदार उपस्थित होते.
सावंतवाडी मतदार संघाचे आमदार केसरकर यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून एक बाजू भक्कमपणे बजावली होती. तर मुख्यमंत्री शिंदे यांनीही दोन दिवसापूर्वी सावंतवाडी मतदार संघातील प्रश्नावर बैठक घेऊन केसरकरांवरील आपले प्रेम दाखवून दिले होते. आज केसरकर यांच्या वाढदिनी सकाळीच मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत शुभेच्छा दिला. त्यात राज्याचे माजी गृह राज्यमंत्री, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, आमचे प्रवक्ते व माझे स्नेही श्री. केसरकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असं ट्वीट मध्ये म्हटल होते. त्यानंतर प्रत्यक्ष भेटी दरम्यान भगवी शाल अन पुष्पगुच्छ देऊन त्यांना दिर्घायुष्य लाभो अशा शुभकामना दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78632 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top