
कुडाळात वैश्यवाणी समाजतर्फे 24 ला शैक्षणिक साहित्य वाटप
कुडाळात वैश्यवाणी समाजतर्फे
२४ ला शैक्षणिक साहित्य वाटप
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १९ः कुडाळ तालुक्यातील वैश्यवाणी समाज, कुडाळतर्फे वैश्यवाणी ज्ञातीतील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वितरण आणि हुशार विद्यार्थांचा सत्कार समारंभ २४ ला होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घ्यावयाचा असेल, त्यांनी बुधवारपर्यंत (ता. २०) प्रत्येक गावातील कमिटीकडे अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे.
पावशी, खुटवळवाडी, खोचरेवाडी, कसाल, आंब्रड, घोटगे, जांभवडे, कुपवडे, कडावल, नेरूर, माणगाव या ठिकाणी ग्राम समित्या स्थापन केल्या आहेत. या गावातील विद्यार्थ्यांनी आपले अर्ज समिती प्रमुख यांच्याजवळ द्यावयाचे आहेत. समिती प्रमुखांनी २१ पर्यंत आपल्या शिफारशीसह भार्गवराम धुरी गुरुकृपा स्टोअर, बाजारपेठ कुडाळ व सुनील धुरी, सिध्दाली मॅचिंग सेंटर, शिवाजी पुतळा कुडाळ यांच्याकडे सादर करावयाचे आहेत. वरील गावांव्यतिरिक्त असलेल्या गावातील व कुडाळ शहरातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आपले अर्ज २१ पर्यंत अस्मिता बांदेकर (अध्यक्ष) यांच्याकडे द्यावेत. अर्जासोबत मार्क लिस्टची झेरॉक्स प्रत आवश्यक आहे. किमान ४० पेक्षा जास्त मार्क असलेले अर्ज स्वीकारले जातील. रविवारी (ता. २४) सकाळी १०.३० वाजता महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे समारंभ होणार आहे. या समारंभात वैश्यवाणी ज्ञातीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच स्कॉलरशिप व दहावीमध्ये ७५ टक्के गुण, बारावीमध्ये ६० टक्केपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या, खेळामध्ये जिल्हा व राज्यस्तरावर विशेष प्राविण्य मिळविलेल्या आणि शासनाच्या विशेष स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सत्कारासाठी आपले नाव स्थानिक समितीकडे व वर उल्लेखिलेल्या पदाधिकाऱ्यांकडे २१ पर्यंत गुणपत्रिकेच्या झेरॉक्स प्रतीसह सादर करावे, असे संस्थेच्या कार्यवाह सौसुचित्रा भोगटे कळवितात.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78728 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..