चिपळूण ः पोलिसाना कॅशलेस उपचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः पोलिसाना कॅशलेस उपचार
चिपळूण ः पोलिसाना कॅशलेस उपचार

चिपळूण ः पोलिसाना कॅशलेस उपचार

sakal_logo
By

rat19p१६.jpg
L37076
चिपळूण ः अपरांत हॉस्पिटल येथे महाराष्ट्र पोलिस कुटुंब आरोग्य योजनेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार शेखर निकम, सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळोखे, यतीन जाधव.
.......
अपरांत हॉस्पिटलमध्ये पोलिसांवर कॅशलेस उपचार

पोलिस कुटुंब आरोग्य योजनेचे उदघाटन; आमदार निकमांकडून कौतुक
चिपळूण, ता. १९ ः "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" ही महत्त्वाची भूमिका पार पाडत असताना अनेकदा पोलिसाना शारीरिक व मानसिक ताणतणावातूनच जावे लागते. त्यांच्यासाठी "आरोग्य रक्षणाय, व्याधी निग्रहणाय", अशी भूमिका अपरांत हॉस्पिटल निश्चितपणे पार पाडेल, अशी भावना आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केली.
अपरांत हॉस्पिटल येथे महाराष्ट्र पोलिस कुटुंब आरोग्य योजनेचा आरंभ करण्यात आला. या योजनेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम चिपळूण-संगमेश्वर विधानसभेचे आमदार शेखर निकम व सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांच्या हस्ते नुकताच पार पडला. या योजनेअंतर्गत पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांना अपरांत हॉस्पिटल येथे कॅशलेस आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. पोलिसांसाठी अशा प्रकारची योजना उपलब्ध करून देणारे अपरांत हॉस्पिटल हे उत्तर रत्नागिरी येथील पहिले हॉस्पिटल आहे. या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांनी अपरांत हॉस्पिटलच्या या योजनेचा लाभ बाणकोट ते संगमेश्वरमधील सर्व पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना चिपळूणसारख्या मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल अपरांत हॉस्पिटलचे आभार मानले. हॉस्पिटलचे मुख्य संचालक डॉ. यतिन जाधव यांनी तीन वर्षापूर्वी अपरांत हॉस्पिटलरूपी लावलेले रोपटे समाजातील विविध घटकांसाठी त्यांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करत आहे. यामध्ये महाराष्ट्र पोलिस कुटुंब आरोग्य योजनेची भर पडली, असे सांगितले. या कार्यक्रमाला हॉस्पिटलचे संचालक डॉ. विजय रीळकर, यशवंत देशमुख, अब्बास जबले, शेखर पालकर यांच्यासमवेत तालुका जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अरुण पाटील, सेक्रेटरी नीयाज पाते, ज्येष्ठ प्रॅक्टिशनर संतोष दाभोळकर, सर्व तज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते. निवेदन अमर भोसले यांनी केले.
-----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78745 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..