जीएसटी प्रश्नाबाबत पाठपुरावा करू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीएसटी प्रश्नाबाबत पाठपुरावा करू
जीएसटी प्रश्नाबाबत पाठपुरावा करू

जीएसटी प्रश्नाबाबत पाठपुरावा करू

sakal_logo
By

37121
मुंबई ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देताना ललित गांधी. शेजारी आशिष नहार, संदीप भंडारी आदी.


जीएसटी प्रश्नाबाबत पाठपुरावा करू

मुख्यमंत्री शिंदे ः महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स शिष्टमंडळास ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १९ ः नॉन ब्रँडेड अन्नधान्य व खाद्यपदार्थांवर नव्याने लावलेल्या पाच टक्के जीएसटी संबंधात केंद्राकडे हा कर रद्द करण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांना दिले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अग्रिकल्चर या राज्याच्या व्यापार, उद्योग कृषी क्षेत्राच्या शिखर संस्थेच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नवीन लावण्यात आलेल्या जीएसटीमुळे राज्यातील सामान्य जनतेबरोबर व्यापाऱ्यांमध्ये असलेल्या तीव्र भावनांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली व हा कर रद्द होण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यापारी व जनतेच्या भावनांशी आम्ही सहमत असून हा कर रद्द करावा यासाठी राज्य सरकार केंद्र शासनस्तरावर पाठपुरावा करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली. व्यापार, उद्योग क्षेत्राच्या विविध प्रश्नांबाबत चेंबर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळासमवेत लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित करू, अशी ग्वाहीही शिंदे यांनी दिली. यावेळी शिष्टमंडळात संदीप भंडारी, आशिष नहार, निरव देडिया, विकास अच्छा, दीपक मेहता, सागर नागरे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष गांधींनी या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांच्याबरोबर झालेली चर्चा अतिशय सकारात्मक झाल्याचे सांगितले. राज्य शासन याविषयी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याने याविषयी समाधानकारक तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78781 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..