रघुवीर घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रघुवीर घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प
रघुवीर घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प

रघुवीर घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प

sakal_logo
By

रघुवीर घाटः लोगो
...
rat१९१९p२६,
३७१४३

rat१९१९p२७
३७१४४
खेड ः रघुवीर घाटात कोसळलेली दरड.
...
rat१९१९p२८
३७१४५
ः सदानंद मोरे, संपर्क तुटलेल्या भागातील रहिवासी
...
घाटात दरड कोसळून २१ गावे संपर्कहीन

वाहतूक ठप्प; कांदाटी खोऱ्‍यातील गावांचा संपर्क तुटला; पर्यटन बंदी योग्यच
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १९ ः रत्नागिरी व सातारा जिल्हा जोडणार्‍या रघुवीर घाटात मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळून या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे रघुवीर घाटाच्या पलीकडच्या कांदाटी खोऱ्‍यातील २१ गावांचा संपर्क तुटला असून सार्वजनिक बांधकाम विभागातून या ठिकाणी एक जेसीबी व बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झालेले आहेत. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उप विभागाच्या उपअभियंता श्रीमती आशा जाटाळ यांनी दिली. हा घाट १ जुलैपासूनच दोन महिन्यांसाठी पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय योग्य असल्याचेच या दुर्घटनेने अधोरेखित झाले आहे.
रघुवीर घाटात दरड कोसळल्यामुळे शिंदी, वळवण, उचाट, मोरणी, म्हाळुंगे, सालोशी, खांदाट, वाघावळे, लामज, निवळी, परबत, बन, चकदेव, आकल्पे सह अन्य गावांकडे जाण्याचा मार्ग सद्यस्थितीत बंद झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रघुवीर घाटात ज्या ठिकाणी धोकादायक दरड किंवा अतिवळणे आहेत. तसेच मुसळधार पावसामुळे घाटमाथ्यावरील रस्त्यालगत घळी निर्माण झाल्या आहेत. त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षित करण्याचे काम गेले काही दिवस सुरू होते. मुसळधार पावसामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हा घाट १ जुलैपासूनच दोन महिन्यांसाठी पर्यटकांसाठी बंदच ठेवण्यात आला आहे. पर्यटक जाऊ नयेत, यासाठी या घाटाच्या पायथ्याशीच पोलिसांनी बॅरिकेटींग देखील केलेले आहे. त्यामुळे दरड कोसळून कोणतीही दुर्घटना घडली नाही. ही कोसळलेली दरड मोकळी करण्यासाठी रघुवीर घाटात जेसीबी आणि बांधकामचे कर्मचारी गेले असून, ही दरड मोकळी करण्याचे काम संध्याकाळी उशीरापर्य़ंत सुरू होते, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून मिळाली.
---
चौकट ः
शासनस्तरावर विशेष प्रयत्न हवेत
दरवर्षी पावसाळ्यात रघुवीर घाटात दरड कोसळणे, हे नेहमीचेच दुखणे झाले आहे. त्यामुळे आमच्या कांदाटी खोऱ्‍यातील गावांचा संपर्क नेहमीच तुटतो आहे. यावर शासनस्तरावर कायमस्वरुपी उपाय होणे आवश्यक आहे. शासन दरबारी केवळ कागदोपत्री आम्ही सातारा जिल्ह्याला जोडले गेलो आहोत. पण भौगोलिक दृष्ट्या रत्नागिरी जिल्ह्याशी आमची नाळ जुळली आहे. शाळा, बॅका, रुग्णालय, औषधोपचारासह अन्य सगळ्याच बाबतीत आम्हाला रत्नागिरी जिल्ह्याचा आधार आहे. त्यामुळे दरवर्षीच्या पावसाळ्यात दरडीच्या दुखण्यातून आम्हाला बाहेर काढण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न व्हावेत अशी मागणी शिंदी -वळवण गावचे ग्रामस्थ सदानंद मोरे यांनी केली आहे.
---

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78803 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top