खारेपाटण ग्रामपंचायतीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारेपाटण ग्रामपंचायतीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप
खारेपाटण ग्रामपंचायतीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

खारेपाटण ग्रामपंचायतीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

sakal_logo
By

37169
खारेपाटण : येथील जिल्‍हा परिषद शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्‍य वाटप प्रसंगी मान्यवर.

खारेपाटण ग्रामपंचायतीतर्फे
शैक्षणिक साहित्याचे वाटप
खारेपाटण, ता.१९ : खारेपाटण ग्रामपंचायतीच्यावतीने १५ व्या वित्त आयोगाच्या राखीव शैक्षणिक फंडातून गावातील सर्व जिल्‍हा परिषद शाळा आणि हायस्कूलमधील मुलांना शालेय साहित्‍य, गणवेश आणि दप्तर आदींचे वितरण केले. सरपंच रमाकांत राऊत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
खारेपाटण शाळा नं.१ येथे झालेल्‍या या कार्यक्रमाला उपसरपंच इस्माईल मुकादम, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गुरव, शमशुद्दीन काझी, श्रीमती अंजली कुबल, उज्ज्वला चिके, रीना ब्रम्हदंडे, आरती कर्ले, सोनल लोकरे आदी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचे केंद्र शाळा मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी स्वागत केले. खारेपाटण केंद्र शाळेनंतर रामेश्वर नगर हसोळटेम्ब कोंडवाडी, उर्दू शाळा काझीवाडी, उर्दू शाळा बंदरगाव, संभाजी नगर टाकेवाडी तसेच शेठ न.म.विद्यालय खारेपाटण आणि ज्युनिअर कॉलेज खारेपाटण आदी शाळांतील विद्यार्थ्यांना वह्या, गणवेश, दप्तर आदींचे वाटप करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78840 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top