आरजीपीपीएल कंपनीला सव्वाचार कोटीची कर नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरजीपीपीएल कंपनीला सव्वाचार कोटीची कर नोटीस
आरजीपीपीएल कंपनीला सव्वाचार कोटीची कर नोटीस

आरजीपीपीएल कंपनीला सव्वाचार कोटीची कर नोटीस

sakal_logo
By

आरजीपीपीएल कंपनीला ग्रामपंचायतींची नोटीस
अंजनवेल, रानवी व वेलदूरचा इमारत, जमीन कर थकवला; तत्काळ वसुलीचा आदेश
गुहागर, ता. १९ ः तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाला येथील अंजनवेल, रानवी व वेलदूर ग्रामपंचायतींनी एकूण ४ कोटी २५ लाख ४५ हजार ५८० रुपयांची जमीन व इमारत कराची नोटीस बजावली आहे. पहिली पंधरा दिवसांची मुदत संपुष्टात आली असून, दुसरी नोटीस बजावण्यात येणार आहे; मात्र तीन नोटीसनंतरही कर न भरल्यास जप्तीची कार्यवाही सुरू केली जाणार असल्याची माहिती विस्तार अधिकारी स्वप्नील कांबळे यांनी दिली.
येथील रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाने २०२१-२२, २०२२-२३ या दोन वर्षाचा येथील अंजनवेल, रानवी व वेलदूर ग्रामपंचायतीचा इमारती व जमीन कर थकवला आहे. कर देण्यास कंपनीने नकार दिला होता. ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत करवसुली कायद्याप्रमाणे वसुलीच्या नोटीस बजावण्याची कार्यवाही केली होती. या विरोधात आरजीपीपीएल कंपनीने पंचायत समितीमध्ये अपील दाखल केले होते. हा दावा पाच महिने सुरू होता. जून महिन्यामध्ये या दाव्याचा निकाल येथील तीनही ग्रामपंचायतींच्या बाजूने लागला होता. या निकालामध्ये ग्रामपंचायतीने तत्काळ करवसुली करावी, असा आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिला होता. त्याप्रमाणे अंजनवेल ग्रामपंचायतीने २०२१-२२चा १ कोटी ५३ लाख ७८ हजार ३११ रु., २०२२-२३चा १ कोटी ४४ लाख ४४ हजार २५७ रु., रानवी ग्रामपंचायतीने २०२१-२२चा ३८ लाख ५३ हजार ४३५ रु., २०२२-२३ चा ३४ लाख ८३ हजार ८५२ रु., वेलदूर ग्रामपंचायतीने २०२१-२२चा ३७ लाख ६९ हजार ५५९ रु., २०२२-२३ चा ३६ लाख १६ हजार ४१६ रु. जमीन व इमारती कराची मागणी पहिल्या नोटीसद्वारे केली आहे.

चौकट
त्यानंतरच जप्ती...
पहिल्या नोटीसचा १५ दिवसांचा कालावधी संपुष्टात आला आहे. अशा तीन नोटीस बजावण्यात येणार आहेत. त्यानंतर जप्तीची कार्यवाही केली जाणार आहे, असे विस्तार अधिकारी स्वप्नील कांबळे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78853 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top