rat1922.txt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rat1922.txt
rat1922.txt

rat1922.txt

sakal_logo
By

वेध गणेशोत्सवाचेः लोगो
............
चिपळुणातील श्री सार्वजनिक मंडळाचा
गणेशोत्सव यंदा करणार दिमाखात
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० ः ''श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूण''चा सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी धुमधडाक्यात साजरा होणार आहे. या मंडळाचे चिपळूणचे हे ७१ वे वर्ष आहे. गेली दोन वर्षे शासनाच्या नियमांना अधिन राहून अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनाचे संकट टळल्यावर यावर्षी ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान दरवर्षीप्रमाणे माधव सभागृह भोगाळे चिपळूण येथे दिमाखात साजरा होणार आहे.
यावर्षीच्या गणेशोत्सव नियोजनाची पहिली बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे यावर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध प्रकारच्या स्पर्धा, रंगावली प्रदर्शन, चलचित्र देखावा व धार्मिक कार्यक्रम भरगच्च स्वरूपात साजरे करणार आहेत. दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव कालावधी सोडून उक्ताड येथे संस्कारक्षम विनामूल्य बालवाडी, विनामुल्य आयुर्वेदिक उपचार शिबिर, आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, (कै.) कमळाकर चितळे व्याख्यानमाला, आदी उपक्रम दरवर्षी राबवण्यात येतात. या सर्व कार्यक्रम व विविध स्पर्धांना चिपळूण शहर व तालुक्यातील विविध संस्था, नागरिक व विद्यार्थीवर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा तसेच लवकरच विविध स्पर्धांचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ पाटणकर, कार्याध्यक्ष रमण डांगे, कार्यवाह नित्यानंद भागवत, खजिनदार रमेश बागवे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78862 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..