जिल्ह्यात ऑगस्टमध्ये राष्ट्रीय लोकअदालत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात ऑगस्टमध्ये 
राष्ट्रीय लोकअदालत
जिल्ह्यात ऑगस्टमध्ये राष्ट्रीय लोकअदालत

जिल्ह्यात ऑगस्टमध्ये राष्ट्रीय लोकअदालत

sakal_logo
By

जिल्ह्यात ऑगस्टमध्ये
राष्ट्रीय लोकअदालत
सकाळ वृत्तसेवा
ओरोस ः राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार १३ ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन जिल्हा न्यायालय व सर्व तालुका दिवाणी न्यायालयात करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी प्राधिकरण सचिव डी. बी. म्हालटकर यांनी दिली.
जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश, तर तालुका न्यायालयात दिवाणी न्यायाधीश उपस्थित राहणार आहेत. त्या त्या न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे पक्षकारांच्या सहमतीने ठेवून सामंजस्याने व तडजोडीने मिटविली जाणार आहेत. सकाळी १०.३० वाजता ही लोकअदालत सुरू होणार आहे. प्रलंबित असलेली तडजोडपात्र फौजदारी, दिवाणी, कौटुंबिक वाद, मोटार अपघात भरपाई, भूसंपादन प्रकरणे, वादपूर्व प्रकरणे या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवावी. तसेच लोकअदालतीमध्ये केलेल्या तडजोडीमुळे प्रकरणांचा झटपट निकाल लागतो. या न्यायाविरोधात अपील करता येत नाही. या निवाड्याची अंमलबजावणी न्यायालयामार्फत होते. तसेच कोर्ट फी परतावा रक्कम दाखल करणाऱ्यास परत मिळतो. यासाठी अधिक माहितीकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या भ्रमणध्वनीशी संपर्क साधावा, असे आवाहन सचिव म्हालटकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78864 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..