नारिंग्रे हायस्कूलमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारिंग्रे हायस्कूलमध्ये
रानभाज्यांचे प्रदर्शन
नारिंग्रे हायस्कूलमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन

नारिंग्रे हायस्कूलमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन

sakal_logo
By

L37200

नारिंग्रे ः येथील हायस्कूलमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

नारिंग्रे हायस्कूलमध्ये
रानभाज्यांचे प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
देवगड ः तालुक्यातील नारिंग्रे येथील एस. बी. राणे हायस्कूलमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन मांडून भाज्यांची विक्री करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र राणे यांच्या हस्ते झाले.
खुडी गावचे उपसरपंच दीपक कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. यावेळी विविध सेवा सोसायटीचे अध्यक्ष सुनील बापट उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दीपक कदम यांनीही आपले विचार व्यक्त केले. मुलांनी रानात जाऊन आपल्या पालकांसोबत विविध रानभाज्या गोळा केल्या होत्या. शाळेच्या व्हरांड्यांत भाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. पालक, शिक्षकांनी तसेच काही विद्यार्थ्यांनी भाज्या खरेदी केल्या. उपक्रमानंतर विद्यार्थ्यांना उपक्रमाविषयी सांगताना,‘ छान अनुभव होता, विक्री करताना मजा आली, व्यवहार ज्ञानात भर पडली, आणि आई-वडिलांना व्यवसाय करताना काय त्रास होत असेल याचीही जाणीव झाली,‘असे सांगितले. दरम्यान, उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78880 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..