
पा ५
चिपळुणात भेंडी १०० रूपये तर
टोमॅटोही ६० रुपये किलो!
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ ः चिपळूणमध्ये भाज्यांची आवक कमी झाल्याने दरवाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे भाज्यांचे उत्पादन कमी झाले. गेला आठवडाभर पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला. विस्कळीत झाले. पुरामुळे वाहतूक आणि दळणवळण ठप्प झाल्याने शहरांना भाज्या, फळे आणि इतर गोष्टींचा पुरवठा करणाऱ्या सर्वच सुविधा कोलमडल्या. पावसामुळे शेतकऱ्यांना पीक काढता आले नाही. ज्यांनी पीक काढले त्यांना बाजारात विकता आले नाही. चिपळूणमधील व्यापारी भाजी आणण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगती येथे जातात. गेल्या आठवड्यात परशुराम आणि कुंभार्ली घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी चिपळूणबाहेर न जाणे पसंत केले. त्यामुळे व्यापाऱ्यांनाच चांगली आणि मुबलक भाजी मिळाली नाही. एकूण आठ दिवसांत ६० ते ७० टक्क्यांनी भाजीविक्रीत घट झाली आहे. आठवड्याभरापूर्वी ६० ते ७० रु. विक्री होणाऱ्या भेंडी आणि गवार भाज्या आता १०० ते १२० रुपये किलोने मिळत आहेत. इतर भाजीपाला आणि फळांच्या किमतीतही वाढ झाली आहे. टोमॅटोही ६० रुपये किलो दराने विकला जात आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78887 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..