संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

कळंवडे येथे महिलांसाठी प्रात्यक्षिके
चिपळूण ः तालुक्यातील मांडकी पालवण येथील गोविंदरावजी निकम कृषी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कळवंडे येथे महिलांसाठी प्रात्यक्षिके घेतली. कृषीच्या सम्राटगटाने कळवंडे सातीनवाडी येथील महिलांसाठी बासुंदी व जाम तयार करण्याचे प्रात्यक्षिक केले. विविध पदार्थावर प्रक्रिया करून त्याची विक्री केल्यास चांगला नफा मिळू शकतो. लघुद्योगातून कुटुंबाला आर्थिक बळकटी मिळण्यासाठी असे उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले. या वेळी सातीनवाडीतील महिलांसह बचतगटाच्या अध्यक्षा उपस्थित होत्या.
-----------------
आंबा कलम प्रात्यक्षिके सादरीकरण
गावतळे ः उद्यानविद्या महाविद्यालय दापोलीच्या उमेद गटातील कृषिकन्यांनी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमअंतर्गत टेटवली येथील मंदार नर्सरी येथे आंबा कलम प्रात्यक्षिके दाखवले. या वेळी आंबा कोय कलम कसे करावे, याची माहिती व प्रात्यक्षिके उपस्थित नागरिकांना दाखवण्यात आली. या वेळी मंदार साळवी व वर्षा साळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी दीक्षा गंभीरराव, जयश्री नाळकर, सृष्टी तायडे, सह्याद्री पांडे, राजनदिनी देवकाते या उमेद गटातील कृषिकन्या उपस्थित होत्या.
--------------
न थांबता स्पर्धा परीक्षांची तयारी करा
चिपळूण ः आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. आता आपल्याला जगाशी स्पर्धा करायची आहे. तेव्हा या यशावर समाधान न मानता इथेच न थांबता भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन आपले नाव उज्ज्वल करा, असे आवाहन चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक, युवती, विद्यार्थी काँग्रेस यांच्यावतीने कापसाळ येथे बाळासाहेब माटे सभागृहात विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. या वेळी दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार निकम यांच्या हस्ते केला. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष दिशा दाभोळकर, माजी आमदार रमेश कदम म्हणाले, शौकत मुकादम आणि शिरीष काटकर यांनीही मार्गदर्शन केले.
---------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78892 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..