मुंडे महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाचे वर्धापन दिनानिमीत्ताने वृक्षारोपण कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंडे महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाचे वर्धापन दिनानिमीत्ताने वृक्षारोपण कार्यक्रम
मुंडे महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाचे वर्धापन दिनानिमीत्ताने वृक्षारोपण कार्यक्रम

मुंडे महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाचे वर्धापन दिनानिमीत्ताने वृक्षारोपण कार्यक्रम

sakal_logo
By

rat१९p२१.jpg
३७०८८
मंडणगड ः महाविद्यालयाचे परिसरात वृक्षारोपण करताना संस्थेचे संचालक आदेश मर्चंडे.

मंडणगडात मुंडे महाविद्यालयात वृक्षारोपण
मंडणगड, ता. १९ ः लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, विभाग व सांस्कृतिक विभागाच्यावतीने मुंबई विद्यापीठ वर्धापनदिनाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरवात मुंबई विद्यापीठ गीताचे गायन करून करण्यात आली. त्यानंतर डॉ. घाडगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मुंबई विद्यापीठाच्या १६५व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जाधव यांनी सांगितले की, मुंबई विद्यापीठ १८ जुलै १८५७ला ब्रिटिश राजवटीत स्थापन झाले. त्या काळी देशामध्ये फक्त तीन विद्यापीठे होती. कलकत्ता, मद्रास व मुंबई. आज ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सुमारे आठशे महाविद्यालये मुंबई विद्यापीठाशी संलग्नित आहेत. हे विद्यापीठ सुरवातीपासूनच एक दर्जेदार शिक्षणाचे केंद्र राहिले आहे. आजतागायत तो वारसा विद्यापीठाने कायम जपला असल्याचे त्यांनी सांगितले. महाविद्यालयामध्ये विद्यापीठ वर्धापनदिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाचा ऱ्हास होत चालला आहे. भविष्यात त्याचे परिणाम हे भयावह असणार आहेत. म्हणून प्रत्येक व्यक्तीने किमान एकतरी झाड लावणे आवश्यक आहे. वृक्षसंवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. महाविद्यालयीन युवकांनी यात हिरीरिने सहभाग घेऊन त्यांनी स्वतःपासून या राष्ट्रीय कार्याची सुरवात करावी, असेही त्यांनी सांगितले. या वेळी काजू, आंबा, निलगिरी, गुलमोहर, वड आदी विविध प्रकारची रोपे लावण्यात आली. यामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. शरिफ काझी, डॉ. संगीता घाडगे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78905 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top