मालवणातील पाणी निचऱ्याचा प्रश्न लवकरच लागणार मार्गी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणातील पाणी निचऱ्याचा
प्रश्न लवकरच लागणार मार्गी
मालवणातील पाणी निचऱ्याचा प्रश्न लवकरच लागणार मार्गी

मालवणातील पाणी निचऱ्याचा प्रश्न लवकरच लागणार मार्गी

sakal_logo
By

37221
मालवण ः मेकॅनिकल रोड येथे साचणाऱ्या पाणीप्रश्न पाहणी करताना भाजप पदाधिकारी, पालिका कर्मचारी व नागरिक.


मालवणचा पाणी निचऱ्याचा
प्रश्न लवकरच लागणार मार्गी
मालवण, ता. १९ : शहरातील पोष्ट ऑफिससमोरील मेकॅनिकल रोड येथे सतत साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न भाजपच्या पुढाकारातून मार्गी लागणार आहे. या ठिकाणी गटार खोदाई करून त्यावर लाद्या टाकण्याच्या सूचना पालिका प्रशासनास देण्यात आल्या आहेत. यावर तत्काळ कार्यवाही व्हावी, अशी मागणीही प्रशासनाकडे केली.
पावसाळी कालावधीनंतर रस्त्यावर मधोमध दोन ठिकाणी सिमेंट काँक्रिट गटार उभारणी केली जाईल. पावसाळी कालावधीत येथील सर्व पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न असल्याचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी सांगितले. आज शहरातील मेकॅनिकल रोड येथील साचलेल्या पाणी परिसराची भाजप पदाधिकाऱ्यांनी पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, आबा हडकर, राजू बिडये आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78913 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..