
संगमेश्वर ः चार महिन्यात रस्त्याची दुरवस्था..
शास्त्रीपूल - नायरी मार्गः लोगो
...
rat१९p३५.jpg
37185
ः संगमेश्वर ः शास्त्रीपूल - नायरी रस्त्याची दुरवस्था.
.......
रस्त्याची चाळण; अपघातांना निमंत्रण!
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १९ ः मार्च २०२२ अखेर पूर्ण करण्यात आलेल्या रस्त्याची चार महिन्यात दुरवस्था झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील शास्त्रीपूल ते नायरी रस्त्याच्या सव्वातीन कोटीतील कामापैकी पहिला टप्पा शास्त्रीपूल ते कसबा कुंभारवाडी पूल हा अडीच कि.मी. अंतराचा रस्ता मार्च २०२२ अखेर पूर्ण करण्यात आला होता. या कामावर स्थानिक कार्यकर्त्यांनी काम योग्यप्रकारे होण्यासाठी लक्ष ठेवले होते. प्रत्यक्ष उभे राहून काम करून घेतले होते; मात्र असे असतानाही पावसाळा सुरू होऊन दीड महिना होतो न होतो तोच या रस्त्याची कसबा हायस्कूलजवळ अक्षरशः चाळण झाली असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. येथील गटारे गायब झाली असून मोठा पाऊस आल्यास ढोपरभर पाणी साचत असल्याने खड्ड्याचा अंदाज न आल्याने छोटे छोटे अपघात होत आहेत तर विद्यालयात जाणाऱ्या विध्यार्थ्यांच्या अंगावर घाण पाणी उडत असल्याचे चित्र दिसत आहे. वास्तविक या हायस्कूलजवळ मोरीची आवश्यकता असताना तेथे मोरी सोडाच; पण साधे गटारही पाडले नासल्याने या रस्त्याची ही अवस्था झाल्याचे बोलले जात असून याचा विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम देवरूख विभागच्या अभियंत्यांनी या रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराची पाठराखण केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
-------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78933 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..