
संगमेश्वर ः फणसवणेत सार्वजनिक विहिर दुर्लक्षित
rat19p32.jpg
37182
ः संगमेश्वर ः फणसवणेत सार्वजनिक विहिरीवर झाकण म्हणून टाकलेल्या ग्रीन नेटवरही कचरा.
......
फणसवणेत विहिर दुर्लक्षित;
नागरिकांना पाणीपुरवठा दुषित !
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १९ ः तालुक्यातील फणसवणे हद्दीतील विचारेवाडी येथील सार्वजनिक विहिरीकडे ग्रामपंचायतीला पाहायला वेळ नसल्याने या विहिरीचे दुषित पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असल्याने ग्रामस्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. फणसवणेमध्ये प्रादेशिक नळपाणी योजना सुरू असली तरी काहीवेळा दोन ते चार दिवस पाणी येत नाही. त्या वेळी विचारेवाडी आणि कपिलनगरमधील साबळे यांची चार घरे या विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करत असतात.
गेली दोन वर्षे या विहिरीतील गाळ काढलेला नाही. या विहिरीवर झाकण म्हणून ग्रीन नेट टाकलेले आहे. त्यावर पालापाचोळा साचला असून, तो कुजल्याने त्यामध्ये जंतू निर्माण झाले आहेत. या विहिरीतील पाणी शुद्धीकरण करण्यासाठी पाऊस पडल्यास टीसीएलचा वापर केलेला नाही. तरीही हे पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत आहेत. ही विहीर रस्त्याला लागून असून, पदाधिकारी याच रस्त्याने नेहमी ये-जा करत असून सरपंच यांच वाडीतील आहेत. तरीही या गंभीर प्रकाराकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. उद्या एखादी साथ आल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
--------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78937 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..