पुरात अडकलेल्या प्रवाशांसाठी मॉकड्रील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरात अडकलेल्या प्रवाशांसाठी मॉकड्रील
पुरात अडकलेल्या प्रवाशांसाठी मॉकड्रील

पुरात अडकलेल्या प्रवाशांसाठी मॉकड्रील

sakal_logo
By

पुरात अडकलेल्या
प्रवाशांसाठी मॉकड्रील
मुंबई, ता. १९ : मुंबईत पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकल ट्रेनच्या प्रवाशांसाठी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून लवकरच मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. लोकल ट्रेन पावसाच्या पाण्यामुळे विस्कळित झाल्यास प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी  हे मॉकड्रिल घेण्यासाठीची  बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत प्रत्येक विभागातील नोडल अधिकाऱ्याला मदतकार्य पोहचवण्याच्या अनुषंगाने सूचनाही देण्यात आल्या. 
मुंबई महापालिकेने मुंबईतील २४ विभागांमध्ये एक नोडल अधिकारी हा पुरात अडकलेल्या लोकल ट्रेनच्या प्रवाशांच्या मदतीसाठी अभियंता दर्जाचा अधिकारी नेमण्यात आला आहे. प्रवाशांना महापालिकेच्या निवाऱ्याच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देतानाच वैद्यकीय सुविधा आणि खाण्या-पिण्याच्या सुविधा देण्यात येतील. आपत्कालीन सुविधा उपलब्ध करून देतानाच अशा प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्याच्या उद्देशाने  मॉकड्रिल करण्याचे  आदेश आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत दिले होते.  पावसाळ्यात रेल्वे सेवा विस्कळित झाल्यास प्रवाशांची  गैरसोय होऊ नये, तसेच प्रवाशांना योग्य मदत मिळावी, यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्कालीन कक्षाला  दिलेल्या भेटीतही  दिल्‍या होत्‍या. अशा आपत्कालीन परिस्थितीत लोकल ट्रेन सेवा विस्कळित झाल्यास अशा प्रसंगी प्रवाशांना नजीकच्या परिसरात पोहचता यावे, यासाठी एसटी आणि बसची पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश तसेच सुनिश्चित कार्यपद्धती (एसओपी) बाबत कार्यवाही करण्याचेही आदेश आयुक्त चहल यांनी दिले होते. पूरस्थितीसारख्या  संभाव्य परिस्थितीत नागरिकांच्या  सुविधेसाठी ४०० जादा बसेस वेगवेगळ्या ठिकाणांहून सोडण्याची बेस्टने तयारी केली आहे.
--
गोवंडीतील प्रदूषणाची
सीपीसीबीकडून दखल
मुंबई, ता. १९ : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांना गोवंडीतील बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट प्लांटच्या विरोधातील स्थानिकांच्या तक्रारीमुळे तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
घाटकोपर मानखुर्द लिंक रोड येथे असणाऱ्या देवनार डम्पिंग ग्राऊंडवर मे. एसएमएस एनवोक्लिन प्रा. लि.च्या बायोमेडिकल वेस्ट प्रकल्‍पामधून होत असलेल्या प्रदूषणाविरोधात स्थानिक संगम वेल्फेअर सोसायटीने सीपीसीबीकडे तक्रार केली होती. यामधून विषारी वायू हवेत सोडले जात आहे. या प्रदूषणाचा रहिवाशांना त्रास होत असल्याचे सोसायटीने केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रदूषणाचा त्रास होऊनच स्थानिकांना कर्करोग, क्षयरोग तसेच आणखी जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागत असल्याची सोसायटीचे म्हणणे आहे. या प्रकरणाची सीपीसीबीने दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिकांच्या प्रदूषणाबाबतच्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करावी, असे आदेश सीपीसीबीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख व्ही. पी. यादव यांनी दिले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79007 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..