फोटोसंक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त
फोटोसंक्षिप्त

फोटोसंक्षिप्त

sakal_logo
By

L३७२८८

कुडाळ ः महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व कुटुंबियांसाठी बुस्टर डोस लसीकरण शिबिर प्रसंगी अधीक्षक अभियंता विनोद पाटील व मान्यवर.

''महावितरण''च्या कर्मचाऱ्यांसह
कुटुंबियांना बुस्टरचे लसीकरण
कुडाळ, ता. २० ः आजादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून जिल्हा परिषद आरोग्य विभाग सिंधुदुर्ग व महावितरण कंपनी सिंधुदुर्ग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महावितरण कंपनीचे सर्व अधिकारी, कर्मचारी, बाहुस्त्रोत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी बुस्टर डोस लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते.
या शिबिरामध्ये महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन बुस्टर डोस लसीकरणाचा लाभ घेतला. महावितरण कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय असे मिळून एकूण ४६५ जणांना लसीकरण करण्यात आले. महावितरण कंपनीचे अधिकारी तसेच कर्मचारी उन्हाळा, पावसाळा व आपत्कालीन परिस्थितीत सुध्दा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अथक मेहनत घेतात. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी ही बाब लक्षात घेऊन बुस्टर डोस लसीकरण शिबिर आयोजनाकरिता पुढाकार घेतला. महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी शिबिराचे आयोजन व सहकार्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी नायर तसेच आरोग्य विभागाचे डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
...............
L३७२८९

आंबोली ः बसस्थानक इमारतीच्या छपराला प्लास्टिक आवरण बांधले आहे.

आंबोली बसस्थानक
इमारतीला गळती
आंबोली, ता. २० ः येथील बसस्थानकाच्या इमारतीला दरवर्षी पावसाळ्यात गळती लागली असून छताला प्लास्टिक बांधून येथील व्यवस्थापकांना कामकाज सांभाळावे लागते. बसस्थानकासाठी लाखो रुपये खर्च करून याकडे प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.
येथील बसस्थानकात विविध समस्या भेडसावत आहेत. शौचालयाचे काम अद्याप झाले नाही. चार वर्षे हे काम रेंगाळले आहे. गतवर्षी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांना येथे आणून या ठिकाणी पाहणी केली होती. त्यांनीही तातडीने काम करून महिलांची गैरसोय दूर करण्याबाबत आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले होते; मात्र अद्याप काम अपूर्णच आहे. एस.टी. प्रशासनाच्या या गचाळ कारभाराबाबत प्रवासी आणि ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79065 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..