टुडे पान चार मेन-कडावलमधील कारखान्याला विस्कळीत विज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे पान चार मेन-कडावलमधील कारखान्याला विस्कळीत विज
टुडे पान चार मेन-कडावलमधील कारखान्याला विस्कळीत विज

टुडे पान चार मेन-कडावलमधील कारखान्याला विस्कळीत विज

sakal_logo
By

L37287

कुडाळ ः येथील महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना सिंधुविकास शेड्युल कास्ट इंडस्ट्रीज को-ऑप. सोसायटी लिमिटेड-शिवडावच्या अधिकारी व कर्मचारी.

कडावलमधील कारखान्याला अनियमित विज
व्यवसायावर परिणाम ः कर्मचाऱ्यांनी विचारला जाब
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० ः कडावलमधील ''सिंधुविकास शेड्युल कास्ट इंडस्ट्रीज को-ऑप. सोसायटी लिमिटेड-शिवडाव या जैविक कोळसा निर्मिती कारखान्याला अनियमित वीजपुरवठा होत आहे. याविरोधात तेथील सर्व कर्मचाऱ्यांनी येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली व अधिकाऱ्यांना जाब विचारला.
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कडावलमध्ये हा प्रकल्प सुरु आहे. याला रितसर आवश्यक विद्युत पुरवठा मंजूर केलेला असून संस्थेचा वीजपुरवठा सप्टेंबर-२०१९ मध्ये सुरु करण्यात आलेला आहे. २५ ऑक्टोबर २०१९ ते आज अखेरपर्यंत संस्थेने महावितरणचा पूर्ण विजबिल भरणा केली आहे. परंतु, महावितरणचे अधिकारी मागील दोन वर्षे कारखान्याला नियमित वीजपुरवठा करण्यास टाळाटाळ करत आहेत. हा प्रकल्प ग्रामीण भागात असल्याने त्याचा परिणाम आमच्या उत्पादनावर झालेला आहे. या संस्थेच्या कारखान्यात १०० टक्के महिला कर्मचारी कार्यरत असून त्या उशिरापर्यत काम करु शकत नाहीत. महावितरणकडून सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत कोणत्याही वेळी वीज पुरवठा खंडित केला जातो. सरासरी दिवसातून ४ ते ५ वेळा वीजपुरवठा खंडीत होत असल्याने दिवसातील ८ तास कारखान्यातील कर्मचारी कामाविना बसून राहतात. या प्रकाराला कंटाळून सर्व कर्मचाऱ्यांनी येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील आणि कार्यकारी अभियंता विनोद विपर यांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी कारखान्याच्या तज्ज्ञ संचालिका ज्योती किरण गावकर, युवा उद्योजक किरण गावकर, कारखान्यातील महिला कर्मचारी वर्ग उपस्थित होता. यावेळी महावितरणच्या अधिकारी वर्गाकडून आपली समस्या लवकरात लवकर सोडविली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
महावितरणाला देण्यात आलेल्या निवेदनात येत्या दोन दिवसात वीजपुरवठा करत असलेल्या लाईनवर येणारी सर्व झाडे तोडण्यात यावीत, ओरोस फिडर ते संस्थेपर्यंत आलेल्या एचटीलाईनवरून इतर ठिकाणी जोडणी असेल अशा सर्व टपिंगवर डिओ आणि एबी स्वीच त्वरित बसविण्यात यावेत, महावितरणकडून संस्थेस कायम नियमित वीजपुरवठा होईल, अशी लेखी हमी देण्यात यावी, असे नमूद केले आहे.
--------
चौकट
...अन्यथा
विजबील भरणा नाही
निवेदनात नमूद केलेल्या बाबींची पूर्तता झाली तरच जूनचे आणि या पुढील येणारी वीजबिले संस्थेकडून भरण्यात येतील. अन्यथा जून व पुढील येणाऱ्या सर्व वीज बिलातील वीज वापर व्यतिरिक्त अन्य कोणतेही शुल्क भरणार नसल्याचे कारखान्याकडून सांगण्यात आले.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79066 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..