भाऊ-पुतणीस फणसेत मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाऊ-पुतणीस फणसेत मारहाण
भाऊ-पुतणीस फणसेत मारहाण

भाऊ-पुतणीस फणसेत मारहाण

sakal_logo
By

जिल्ह्यात नवे
११ कोरोनाग्रस्त
ओरोस ः जिल्ह्यात आज कोरोनाचे ११ रुग्ण मिळाले. १८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्ण संख्या ५४ राहिली आहे. आज मिळालेल्या रुग्णांत देवगड ३, दोडामार्ग १, कणकवली ३, कुडाळ ३, वेंगुर्ले १ असा समावेश आहे. आज एकूण १५० नमुने तपासण्यात आले. एकूण बाधित रुग्णसंख्या ५७ हजार ७९१ झाली आहे. तर कोरोनामुक्त संख्या ५६ हजार २०२ झाली आहे. सक्रिय रुग्ण ५४ असून, यात देवगड १२, दोडामार्ग २, कणकवली १०, कुडाळ ९, मालवण ५, वैभववाडी २ तर वेंगुर्ले ११ व जिल्ह्याबाहेरील ३ अशाप्रकारे तालुका निहाय समावेश आहे. यातील दोन रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. उर्वरित रुग्ण होम आयासोलेटेड आहेत. आतापर्यंत एकूण सहा लाख ४४ हजार १५२ कोरोना चाचण्या जिल्ह्यात झाल्या आहेत.
-------
निरवडेत ३१ ला
संयुक्त दशावतार
सावंतवाडी ः निरवडे भूतनाथ मंदिर येथे ३१ जुलैला संयुक्त दशावतार निरवडे यांचा ''थांब लक्ष्मी कुंकू लावते'' हा नाट्यप्रयोग आयोजित केला आहे. निरवडे ग्रामपंचायतीमार्फत नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. यात दादा राणे-कोनसकर, उदय राणे-कोनसकर, प्रशांत मयेकर, सुहास गावडे, बंड्या गोवेकर, बंटी कांबळी, संजय लाड, सागर हनपाडे, श्रीराम साईल, पिंट्या दळवी आदी कलाकार, तर संगीत साथ हार्मोनियम मयुर गवळी, मृदुंगमणी चंद्रकांत खोत, तालरक्षक राजू कलिंगण हे देणार आहेत. नाटकाला विशेष सहकार्य अष्टविनायक नाट्यमंडळ, निरवडे यांचे आहे. लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-----
भोगवे येथील
युवक बेपत्ता
वेंगुर्ले ः भोगवे-नेवाळी येथील केतन सहदेव केळुसकर (२२) हा १८ जुलै रोजी सकाळी साडेनऊपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याचे काका सुभाष दयाळ केळुसकर (वय ५८, रा. भोगवे-नेवाळी) यांनी निवती पोलिस ठाण्यात दिली. केतन हा घरीच असायचा. तो बोटिंगचा व्यवसाय करायचा. सध्या बोटिंग व्यवसाय बंद असल्याने घरी असायचा. १८ ला सकाळी घरात कोणालाही, काही न सांगता तो निघून गेला. नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो आजपर्यंत न आल्याने बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली. अधिक तपास ए. एस. आय. नाईक करीत आहेत.
---------------------
धामापुरात
डंपरला अपघात
मालवण ः कुडाळ-मालवण मार्गावर धामापूर येथे मंगळवारी दुपारी दीड वाजता चिरे वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी टळली. मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. भरधाव डंपरची धामापूर ग्रामपंचायत कार्यालयानजीक रस्त्याकडेला असलेल्या ११ केव्हीच्या खांबाला धडक बसून तो उद्‌ध्वस्त झाला. विद्युत तारा तुटून रस्त्यावर पडल्या. खांबाला धडक दिल्यानंतर डंपर रस्त्याकडेला असलेल्या झाडाला अडकून राहिला, अन्यथा २० फूट खोल भागात डंपर कोसळून मोठे नुकसान झाले असते.
--
भाऊ-पुतणीस
फणसेत मारहाण
देवगड ः किरकोळ कारणावरून विचारणा केल्याचा राग धरून सख्खे भाऊ आणि पुतणीला मारहाण करून दुखापत केल्याची तक्रार येथील पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. याप्रकरणी फणसे-थोटमवाडी (ता.देवगड) येथील एका संशयिताविरुद्ध तक्रार नोंद करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (ता. १८) रात्रीच्या सुमारास घडली. पोलिस हवालदार एफ. जी. आगा अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79067 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..