पा २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पा २
पा २

पा २

sakal_logo
By

rat19p4.jpg
37040
ः सचिन सागर
...
विद्यावाचस्पती पीएच.डी.पदवी
सचिन सागर यांना बहाल
खेड, ता. २० ः सहजीवन शिक्षणसंस्थेच्या आयसीएस महाविद्यालय खेडच्या रसायनशास्त्र विभागातील प्रा. सचिन सागर यांना मुंबई विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती पीएचडी ही पदवी बहाल करण्यात आली.
गेली ७ वर्षे त्यांनी ''सिंथेसिस, कॅरेक्टरायझेशन ऑफ नोवेल नॅनोख्रिस्टलाईन कंपोझिट मेटल ऑक्साईड सिलिका मॅग्नेशियम मॅग्नेट, मॅग्नेशियम झिरकोनेट अँड सिलिका मॅग्नेशियम स्टानेट अँड देअर अॅप्लिकेशन ॲज अ कॅटालिस्ट फॉर ऑरगॅनिक कन्व्हर्जन'' या विषयावर संशोधन केले आहे. त्या माध्यमातून त्यांनी आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत दोन शोधनिबंध प्रसिद्ध केले तसेच आपल्या संशोधनावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत चार शोधनिबंध सादर केले. त्यांना सतीशप्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे येथील रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. गणेश भगुरे यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्राचार्य तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
..
चौकट
रासायनिक अभिक्रिया लवकर घडण्यासाठी..
विशेष म्हणजे डॉ. सागर यांचे संशोधन भविष्यात रासायनिक अभिक्रिया लवकर घडण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यांनी तीन उत्प्रेरके तयार केली आहेत. यामुळे विविध रंगांचे विघटन कमी वेळात होऊ शकते, असे त्यांनी सिद्ध केले आहे. कापड कारखान्यामध्ये कापड आकर्षक बनवण्यासाठी विविध रंग दिले जातात. या कारखान्याच्या सांडपाण्यात रंगाचे प्रमाण असते. हे पाणी खाडी, नदी किंवा तलावामध्ये जाऊन त्यातील प्राणी व सुक्ष्म जीवाणूंना धोकादायक असू शकते. डॉ. सागर यांचे संशोधन यावर महत्वपूर्ण ठरणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79105 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top