चिपळूण ः पावसाचा फटका वाहनधारकांनाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः पावसाचा फटका वाहनधारकांनाही
चिपळूण ः पावसाचा फटका वाहनधारकांनाही

चिपळूण ः पावसाचा फटका वाहनधारकांनाही

sakal_logo
By

पाउस चित्र वापरा
...
पावसाची फटकेबाजी अन वाहनांचा ढकलस्टार्ट

मार्गावर बंद पडण्याच्या प्रकारांत वाढ; इथेनॉलचाही परिणाम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. 20 ः तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका वाहनधारकांनाही बसत आहे. जलयुक्त पेट्रोल भरले गेल्याने चारचाकी आणि दुचाकी वाहने बंद पडत आहेत. त्यामुळे भररस्त्यात वाहने बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. पावसाच्या पाण्यासह इथेनॉलकडे बोट दाखवले जात आहे. गाडीची यंत्रणा ही पेट्रोलवर चालणारी असल्याने इथेनॉलमुळे घात होतो, गाडी बंद पडते; पण त्याला नाईलाज आहे.
तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाची झळ सर्वांनाच बसत आहे; मात्र टणक सुरक्षाकवच असलेल्या पेट्रोलच्या टाकीलाही मुसळधार छेदून जाईल, अशी अपेक्षाही कुणी केली नसेल. तरीही काही वाहनांमध्ये चक्क पाणी आढळत आहे. हे पाणी पेट्रोलच्या टाकीतून वाहनांच्या टाकीत गेले की, पावसाचे पाणी वाहनाच्या टाकीत थेट गेले. याबाबत वाहनचालक आणि पेट्रोल पंपचालक यांना निश्चित सांगता येत नाही; मात्र सध्या दुचाकी आणि चारचाकी वाहने अनेक ठिकाणी बंद पडत आहेत. बंद पडलेली वाहने दुरुस्त करण्यासाठी मेकॅनिक बोलावल्यानंतर त्याने पेट्रोलच्या टाकीतून चक्क पाणी काढले. त्यामुळे वाहनचालकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे.
गुहागर-विजापूर मार्गावरील पोफळी, अलोरे, कुंभार्ली या भागातील अनेक नोकरदार वर्ग त्यांचे दुचाकी आणि चारचाकीने कामासाठी चिपळूणला येतात. त्यातील अनेकांची वाहने रस्त्यातच बंद पडत आहेत. अलोरे येथील महादेव पवार हे आज त्यांची दुचाकी घेऊन चिपळूणकडे येत असताना पिंपळी येथे त्यांचे वाहन बंद पडले. त्यांनी आपली गाडी टोचण करून चिपळूणला दुरुस्तीसाठी आणली. त्या वेळी गाडीच्या टाकीतून चक्क पाणी असल्याचे आढळले.
.........
कोट
अतिवृष्टीत पेट्रोल टाकीत पाणी झिरपू शकते. टाकीत पेट्रोल भरण्यासाठी जे छिद्र असते त्यातून तसेच केबलमधून पाणी जाऊ शकते. पाण्याचा दाब तळपातळीवर वाढल्यास शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देखभाल दुरुस्ती आवश्यक ठरते.
- फैज सय्यद, पोफळी, चारचाकी मेकॅनिक
-----------
कोट
दहा टक्के इथेनॉल मिसळण्याची परवानगी मिळाली आहे. ते वातावरणातील आर्द्रता चटकन शोषून घेते. पेट्रोल हे इथेनॉलपेक्षा पातळ असल्याने ते वरच्या भागात तर इथेनॉल तळावर उतरते. टाकीतून पेट्रोल ओढणारी नळी तळाशी असते, म्हणून इथेनॉल ओढले जाऊन ते गाडीत भरले जाते. गाडीची यंत्रणा ही पेट्रोलवर चालणारी असल्याने इथेनॉलमुळे घात होतो, गाडी बंद पडते; पण त्याला नाईलाज आहे.
- रोहित इंगवले, दुचाकी मेकॅनिक चिपळूण

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79125 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..