चिपळूण ः खतांच्या दरवाढीने शेतकरी त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः खतांच्या दरवाढीने शेतकरी त्रस्त
चिपळूण ः खतांच्या दरवाढीने शेतकरी त्रस्त

चिपळूण ः खतांच्या दरवाढीने शेतकरी त्रस्त

sakal_logo
By

-rat२०p१०.jpg
37332
- चिपळूण ः पावसाने जून महिन्यापासून सातत्य राखल्याने भात खाचरे हिरवीगार दिसू लागल्याने शेतकरी आनंदित आहे.
----------------
खताचे दर वाढले, शेतीचे गणित बिघडले

शेतकरी त्रस्त; मागणीप्रमाणे पुरवठ्याचा अभाव, दरवाढीच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांना कळवणारः निकम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० ः रासायनिक खतांच्या किमतीत दोन महिन्यात तब्बल शंभर ते अडीचशे रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या गळचेपी करणारी आहे. जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी रासायनिक खतांच्या दरवाढीबाबत केंद्र शासनाकडे आवाज उठवावा, झालेली दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. खरीपाच्या हंगामात चांगला पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे; मात्र खतांच्या दरवाढीमुळे शेतकरी नाराज झाला आहे.
चिपळूण तालुक्यात मागणीप्रमाणे खत उपलब्ध झालेले नाही. सुरवातीपासूनच ही ओरड असताना टप्प्याटप्प्याने खतांचा पुरवठा सुरू आहे; मात्र आता बाजारात खताची किंमत वाढल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे.
मागील दोन दिवस पावसाने चांगली उघडीप दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात पिकांना खते देण्याची कामे सुरू केली आहेत. खते घेताना सर्वच रासायनिक खतांच्या किमती वाढलेल्या आढळून आल्या. त्यातच केंद्र शासनातर्फे गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली.
-----------
कोट १
सुपर फॉस्फेटच्या दरात दोनच महिन्यात शंभर रुपयांची अचानक वाढ करण्यात आली आहे. अजून या किंमतीत वाढ होईल, असे बियाणे विक्रेते सांगतात. खरीपाचा हंगाम सुरू असून आता खतांची नितांत गरज आहे. अशावेळी किमती वाढवणे शेतकऱ्यांना महागाईच्या खाईत ढकलण्यासारखे आहेत.
- विलास शिगवण, शेतकरी, अनारी ता. चिपळूण
-------------
कोट २
रासायनिक खतांच्या दरवाढीच्या तक्रारी आल्या आहेत; मात्र त्यावर नियंत्रण केंद्र शासनाचे आहे. खतांच्या किमतीबाबत शेतकऱ्यांच्या नाराजीची माहिती मी मुख्यमंत्र्यांना देणार आहे. त्यांच्या माध्यमातून केंद्राकडे खत दरवाढीसंदर्भात पाठपुरावा करणार आहे.
- शेखर निकम, आमदार चिपळूण
------------
महागाईचा चढता आलेख
सुपर फॉस्फेटची एक बॅग जून महिन्यात ५०० रूपयाला मिळत होती. ती जुलै महिन्यात ६०० रूपयावर गेली. १०ः२०ः२० हे खत गतवर्षी १२५० रुपयांना मिळत होते. ते यंदा १४७० ला मिळत आहे. पोटॅश एक हजार रुपयांना मिळत होते, ते १७०० ला मिळत आहे. १५ः१५ः१५ खत ११५० ला मिळत होते, ते आता १४७० ला मिळत आहे.
..
ग्राफ करावा
दरावर एक नजर..
सुपर फॉस्फेटची बॅगः ६०० रूपये
१०ः२०ः२० खतः १४७० रूपये
पोटॅशः १७०० रूपये
१५ः१५ः१५ खतः १४७० रूपये

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79126 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..