कवठणी गावाला कायमस्वरुपी वायरमन देण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कवठणी गावाला कायमस्वरुपी
वायरमन देण्याची मागणी
कवठणी गावाला कायमस्वरुपी वायरमन देण्याची मागणी

कवठणी गावाला कायमस्वरुपी वायरमन देण्याची मागणी

sakal_logo
By

L३७३५३

वेंगुर्ले ः अधिकाऱ्यांना मागणीपत्र देताना संदेश कवठणकर, सुधा कवठणकर आदी.

कवठणी गावाला कायमस्वरुपी
वायरमन देण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः कवठणी गावासाठी कायमस्वरुपी वायरमन मिळावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने सावंतवाडी तालुकाप्रमुख, ओबीसी सेलचे संदेश कवठणकर यांनी वेंगुर्ले महावितरण अधिकारी मुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कवठणी गावात कित्येक दिवस वारंवार वीज समस्या भेडसावत आहे. याचा परिणाम येथील ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. कवठणी गावासाठी सद्यःस्थितीत एक वायरमन कार्यरत आहे. मात्र, विजेबाबत एखादी समस्या द्यायची झाली तर संबंधित वायरमन यांच्याशी फोनवर संपर्क होऊ शकत नाही किंवा त्यांचा फोन बंद असतो. गावात वायरमन कार्यरत असून सुद्धा सेवा देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे तेथील ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे. कधी -कधी वीज प्रवाह बंद झाल्यास ग्रामस्थांना अंधारात राहावे लागत आहे. त्यामुळे कवठणीसाठी कायमस्वरुपी वायरमन देऊन गावातील समस्या दूर करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत सामाजिक कार्यकर्त्या सुधा कावठणकर, शिवसैनिक समीर सावंत उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79130 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..