''पतंजली''चे सिंधुदुर्गातील कार्य कौतुकास्पद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''पतंजली''चे सिंधुदुर्गातील कार्य कौतुकास्पद
''पतंजली''चे सिंधुदुर्गातील कार्य कौतुकास्पद

''पतंजली''चे सिंधुदुर्गातील कार्य कौतुकास्पद

sakal_logo
By

L37354

कोल्हापूर ः बैठकीत मार्गदर्शन करताना आनंददेव स्वामी.

''पतंजली''चे सिंधुदुर्गातील कार्य कौतुकास्पद
स्वामी आनंद देव ः कोल्हापुरातील बैठकीत शाबासकीची थाप
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः पतंजली योग समितीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील योगजागरणाचे कार्य हे पश्चिम महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे आहे, असे गौरवोद्गार रामदेव बाबांचे परमशिष्य स्वामी आनंद देव यांनी शाहुपुरी-कोल्हापूर येथे झालेल्या पतंजलीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काढल्याची माहिती भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हा प्रभारी महेश भाट यांनी दिली.
कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत पतंजली समितीचे राज्य प्रभारी बापू पाडाळकर तसेच चंद्रशेखर खापणे आदींसह राज्यातील पतंजलीचे ज्येष्ठ पदाधिकारी होते. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पतंजलीचे महामंत्री सर्वानंद दळवी, संवाद प्रभारी रावजी परब, युवा प्रभारी विद्याधर पाटणकर आणि पतंजली सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी डॉ. तुळशीराम रावराणे उपस्थित होते.
स्वामी आनंद देव यांनी रायगड, रत्नागिरी, पुणे, सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यांसह सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. प्रत्येक जिल्ह्यात शिबिर घेतले आणि त्यात दिसून आलेल्या परिस्थितीवरून ते बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पतंजलीच्या कार्याबद्दल त्यांनी विशेष गौरवोद्गार काढले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.
स्वामी आनंद देव यांनी बांदा येथे घेतलेले शिबिर यशस्वी करण्यासाठी सुदन केसरकर, शेखर बांदेकर, विकास केरकर, प्रियांका हरमलकर, आणि पतंजली बांदाच्या सर्वच टीमने परिश्रम घेतले. जुलैमधील मुसळधार पावसाच्या हंगामातही पाच दिवसांचे शिबिर यशस्वी करून दाखविले, म्हणूनच हे उज्ज्वल यश प्राप्त झाले. बांदा टीमबरोबर पतंजलीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, जिल्ह्यातील स्थायी वर्ग संचालकांचे, कार्यकर्त्यांचे आणि सर्व साधकांचे भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हा प्रभारी महेश भाट यांनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79132 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..