
कणकवली : शेती मेळावा
37376
कणकवली ः येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना तहसीलदार रमेश पवार. शेजारी डी. डी. रासम, सुधीर फडके, साक्षी कोरगांवकर आदी.
शेतकऱ्यांनो, सेंद्रीय शेतीची कास धरा
तहसीलदार पवार ः कणकवलीत शेतकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
कणकवली,ता. २० ः शेतीकडे व्यावसायिक दृष्टीकोणातून पाहणे गरजेचे आहे. रासायनिक खतांचा वापर न करता प्रत्येक शेतकऱ्याने सेंद्रीय शेतीकडे वळावे, असे आवाहन तहसीलदार रमेश पवार यांनी येथे केले.
श्वेतक्रांती नंतर आता बळीराजा इंधन क्रांतीकडे वाटचाल करीत आहे. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन एसीएल मीरा क्लीन फ्युएल्स कंपनी अंतर्गत पावणादेवी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. भगवती मंगल कार्यालय येथे हा मेळावा झाला.
कृषी शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी श्री पावणादेवी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी कणकवलीतील शेतकऱ्यांसाठी काही विशेष प्रकल्प राबविणार असून त्याचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या मार्गदर्शन मेळाव्याला कंपनीचे चेअरमन डी. डी. रासम, विनोद गोसावी, सुधीर फडके, साक्षी कोरगावकर आदी उपस्थित होते. साक्षी कोरगांवकर म्हणाल्या की, बचत गटांना देखील या प्रकल्पाचा रोजगार निर्मितीसाठी फायदा होणार आहे. बचतगटांनी शेती व्यवसायाकडे वळावे, शेतीसाठी लागणारे सेंद्रीय खत निर्माण करावे. या प्रकल्पात जास्तीत जास्त बचतटांनी सहभागी व्हावे.’’ श्री. रासम यांनी कंपनीचे उद्धीष्ट आणि शेतकऱ्यांच्या फायद्याबाबत माहिती दिली. तालुक्यातील शेतकऱ्यांना कंपनीच्या उत्पादनाची आणि गुंतवणुकीची माहीती देत आहोत. याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. या प्रकल्पात शेतकऱ्यांनी सहभागी व्यावे, असे आवाहन श्री. रासम यांनी केले.
--
रासायनिक खते हानिकारक
तहसीलदार पवार म्हणाले, शेतीचे तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. रासायिक शेती दीर्घकाळ टिकणारी नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने सेंद्रीय शेती करावी. रासायनिक खते ही मानवी जीवनास हानिकारक आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79167 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..