संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

उमेद गटाकडून गुरूपौर्णिमा साजरी
गावतळे ः दापोली उद्यानविद्या महाविद्यालयाच्या उमेद गटातील कृषिकन्यांनी गावतळे प्राथमिक शाळेत गुरूपौर्णिमा साजरी केली. या वेळी कृषिकन्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना गुरूपौर्णिमेचे महत्त्व सांगितले व शाळेला पुस्तके भेट दिली. मुख्याध्यापक बाचाफळे व शिक्षकांनी यामध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमात सृष्टी तायडे, सह्याद्री पांडे, राजनंदिनी देवकाते, जयश्री नाळंकर, दिक्षा गंभीरराव या कृषिकन्यांनी गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी केली.
------------
जैतापूरचा राजा गणेशोत्सव
मंडळाच्या अध्यक्षपदी दांडेकर
राजापूर ः रौप्यमहोत्सवी उत्सवाकडे वाटचाल करणार्‍या आणि तालुका, जिल्हा आणि राज्यपातळीवरील सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धांमध्ये विविध पुरस्कारप्राप्त तालुक्यातील जैतापूर येथील जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी राकेश दांडेकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. जैतापूरच्या माजी सरपंच शैलजा मांजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ही निवड करण्यात आली. या वेळी निवडलेल्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष भर्तृहरी भाटकर, सचिव सुनील करंगुटकर, खजिनदार वासुदेव नारकर तर कार्यकारिणी सदस्य म्हणून शैलजा मांजरेकर, रेशम लाड, मंगल मयेकर, महेश नारकर, गजानन करमळकर यांची बिनविरोध निवड केली. या सभेला मंडळाचे संस्थापक सचिव आणि सल्लागार गिरीश करंगुटकर, राजन लाड, हर्षद मांजरेकर, सिद्धी शिरसेकर, शुभम भाटकर, गौरव पालकर, दशरथ चाळके आदी उपस्थित होते.
------------
-rat20p7.jpg
2L37317
ः राजापूर ः (कै.) समीर इलेव्हन क्रिकेट संघ आणि शिवाजीनगर भरडवाडी यांच्यावतीने मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या प्रसंगी लाभार्थी विद्यार्थी व मान्यवर.
-------------
शीळमधील शाळेत शालेय साहित्य वाटप
राजापूर ः शहरानजीकच्या शिळ येथील (कै.) समीर इलेव्हन क्रिकेट संघ आणि शिवाजीनगर, भरडवाडी यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळा नं. १ येथील गरजू व होतकरू मुलांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्‍या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. संतोष मोंडे यांच्या अध्यतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला माजी सरपंच रश्मिता पेंढारी, नामदेव नागरेकर, उपाध्यक्षा अंकिता बाईत, सदस्य ज्ञानेश्वर गोंडाळ, सूर्यकांत गोंडाळ, कृष्णा गोंडाळ, देवयानी पेंढारी, रोहिणी गुरव, स्नेहल बाईत, अश्विनी नागरेकर, रजनी पेंढारी, मेघा बाईत आदीं उपस्थित होते.
------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79209 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top