मुख्यमंत्र्यांच्या अपर मुख्य सचिवपदी भूषण गगराणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांच्या अपर मुख्य
सचिवपदी भूषण गगराणी
मुख्यमंत्र्यांच्या अपर मुख्य सचिवपदी भूषण गगराणी

मुख्यमंत्र्यांच्या अपर मुख्य सचिवपदी भूषण गगराणी

sakal_logo
By

F42054 - भूषण गगराणी

मुख्यमंत्र्यांच्या अप्पर मुख्य
सचिवपदी भूषण गगराणी
कोल्हापूर, ता. २० ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अप्पर मुख्य सचिव म्हणून कोल्हापुरचे सुपुत्र व वरिष्ठ सनदी अधिकारी भूषण गगराणी यांची आज नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून जिल्ह्यातील इचलकरंजीचे सुपुत्र विकास खारगे यांनी काम पाहिले होते. श्री. गगराणी यांच्या रूपाने दुसऱ्यांदा कोल्हापूरच्या सुपुत्राला मिळालेली ही संधी आहे.
श्री. गगराणी १९९० च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर त्यांनी राज्याच्या विविध जिल्ह्यांत जिल्हाधिकारी म्हणून, तर पदोन्नतीने विविध पदांवर उल्लेखनीय काम केले होते. या कामांची दखल घेऊनच त्यांच्याकडे सध्या अप्पर मुख्य सचिव नगरविकास, मराठी भाषा विभाग व जलसंपदा विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. त्यांच्याकडील हा कार्यभार कायम ठेवून त्यांची मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव या पदावर नियुक्ती झाली आहे. या पदावरील सध्याचे अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांच्याकडील अतिरिक्त पदाचा कार्यभार संपुष्टात आला. सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी यासंदर्भातील आदेश आज काढले. श्री. गगराणी यांना नव्या पदाचा कार्यभार तातडीने स्वीकारण्याच्या सूचना या आदेशात श्री. गर्दे यांनी केल्या आहेत.
..................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79222 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top