
संक्षिप्त
चार शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप
दाभोळः दापोली तालुक्यातील कुडावळे ग्रामस्थ मंडळ मुंबई यांच्यामार्फत कुडावळे आदीवासीवाडी, कुडावळे नं. १, कुडावळे वळजाई, कुडावळे देवखोल या चारही प्राथमिक शाळांच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामस्थ मंडळ कुडावळेचे अध्यक्ष अंकुश कदम, कमलेश कदम, कुडावळे येथील ग्रामस्थ तसेच माजी सरपंच महेश कदम, समेश कदम उपस्थित होते.
-----------
कर्णबधिर विद्यालयाचा वर्धापन दिन
दाभोळः स्नेहदीप दापोली संचलित इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालयाचा ३८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दीपप्रज्वलन करून व सालाबादप्रमाणे वर्धापनादिनास जैन यांच्याकडून आणला जाणारा केक शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते कापून वर्धापनदिनाची सुरवात करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व गणवेशाचे वाटप करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शाळेचे कर्मचारी संतोष जालगांवकर यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून सन्मान करण्यात आला.
------------
rat20p15.jpg
37393
जालगावः रोटरी क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना नूतन अध्यक्ष संदीप खोचरे व अन्य.
---------
गाजावाजा न करता ‘रोटरी’चे समाजकार्य
दाभोळः रोटरी क्लब ही श्रीमंत लोकांची संघटना आहे, असा माझा समज होता; पण प्रत्यक्षात जेव्हा कार्यपद्धती पाहिली तेव्हा कळले की, ज्या व्यक्तीला समाजासाठी काम करायचे आहे पण ते एकटे करू शकत नाहीत अशी माणसे एकत्रित येऊन कोणताही गाजावाजा न करता जे समाजकार्य करतात ते रोटरी क्लब असे उद्गार या रोटरी क्लब पदग्रहण समारंभाचे प्रमुख पाहुणे जयवंत जालगावकर यांनी काढले. हा समारंभ जालगाव श्री शैल सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सीए संदीप खोचरे, सेक्रेटरीपदी प्रदीप साळवी, खजिनदारपदी विनोद तलाठी यांनी पदग्रहण केले. प्रमुख अतिथी, सर्व पदाधिकारी, सहाय्यक गव्हर्नर आसिफ पठाण, मावळते अध्यक्ष अरूण नरवणकर आदी उपस्थित होते.
--
हिवताप क्षेत्र संघटना अध्यक्षपदी सावंत
दाभोळः आरोग्यसेवा हिवताप हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली असून, ऋषिकेश सावंत यांची अध्यक्ष तर राजेंद्र चौगले यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या संघटनेच्या माध्यमातून आरोग्यसेवा देणाऱ्या हंगामी क्षेत्र कर्मचार्यांसाठी विशेष कार्य केले जाते. यापूर्वी असणाऱ्या कार्यकारिणी सदस्यांची आरोग्यखात्यामध्ये कायमस्वरूपी नियुक्ती झाल्यामुळे जिल्हा कार्यकारिणीमधील पदाधिकारी निवड करणे आवश्यक होते. त्यानुसार निवड केली आहे. यामध्ये सचिव म्हणून प्रशांत शिंदे तर खजिनदार म्हणून सिद्धार्थ भिवंदे यांची निवड करण्यात आली आहे. हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नियुक्ती मिळण्याकरिता ही संघटना नेटाने काम करेल आणि सर्व कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून देईल, असे नवीन अध्यक्ष सावंत यांनी स्पष्ट केले आहे. नवीन कार्यकारिणी निवडीमुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
---------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79233 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..